Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : सात वर्षांपासून २ हजार ८२९ सिंचन विहिरींचे कामे अपूर्ण; नंदुरबार जिल्ह्यातील चित्र

Nandurbar News : पावसाळा कमी झाल्याने यंदा पाणी टंचाईची परिस्थिती भीषण झाली आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात याची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवत आहेत.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : मनरेगाअंतर्गत ग्रामीण भागात सिंचन विहिरींना मंजुरी दिली जात असते. हि प्रक्रिया दरवर्षी केली जात असून नंदुरबार जिल्ह्यात या अशाच पद्धतीने विहिरी मंजूर झाल्या. परंतु जिल्ह्यात मागील सात वर्षात तब्बल २ हजार ८२९ विहिरींचे काम अपूर्ण असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. यामुळे पाणी टंचाईच्या काळात या विहिरींचा काही उपयोग होत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

पावसाळा कमी झाल्याने यंदा पाणी टंचाईची परिस्थिती भीषण झाली आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात याची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवत आहेत. (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील भीषण (Water Scarcity) पाणी टंचाईची समस्या वाढत आहे. दरम्यान टंचाईवर पर्याय म्हणून शासनाच्या वतीने विहिरी खोदण्यासाठी अनुदान दिलं जात असते. परंतु हे अनुदान मिळाल्यानंतर देखील विहिरींचे काम पूर्ण होत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील मनरेगा अंतर्गत मागील ७ वर्षात १३ हजार ५२ सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यापैकी ८ हजार ४८७ कामांना प्रत्यक्ष सुरुवात होऊन ५ हजार ६५८ विहिरींची शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे. तर २ हजार ८२९ सिंचन विहिरींची कामे अपूर्ण आहेत. तांत्रिक अडचणीमुळे जिल्हाभरात सन २०२३ आणि २४ मध्ये सर्वाधिक १ हजार १४२ विहिरींचे काम रखडलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangmeshwar Amba Ghat : संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर दरड कोसळली, वाहतूक पूर्णत: ठप्प; कोकणात जाणाऱ्यांचे हाल

Viral Video: आधी कानाखाली मारली नंतर उचलून आपटल; उधारीवरून ग्राहक अन् दुकानदाराचं भांडण पेटलं, Video व्हायरल

Maharashtra Live Update: पुण्यातील बॉलर पबवर गुन्हा दाखल

Raj Kundra Video: "माझी एक किडनी तुमच्या नावावर..."; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचं वचन, प्रेमानंद महाराज भावुक

Pandharpur News: तिरंगा रंगात रंगले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT