Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: व्हॉट्सॲप स्टेटस पडले महागात; पोलिसांत गुन्हा दाखल

व्हॉट्सॲप स्टेटस पडले महागात; पोलिसांत गुन्हा दाखल

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : दोन धर्मांत तेढ निर्माण होऊन शांतता भंग होईल, असे भडकावू व्हॉट्सॲप स्टेटस ठेवणाऱ्या शहरातील चौघांविरुद्ध (Nandurbar) नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोशल मीडियाचा (Social Media) गैरवापर करणाऱ्या चौघांना अखेर पोलिसांनी आपला हिसका दाखवीत चुकीला माफी नसल्याचे सिद्ध केले आहे. (Tajya Batmya)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील गुरुकुलनगर-२ मधील रहिवासी दिनेश देवीदास भोपे व गोंधळी गल्लीतील रहिवासी जितेश राजू श्रीखंडे या दोघांनी शहरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेतील आरोपीचे छायाचित्र व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवून त्याला प्रोत्साहन देणारे व दोन समाजांत तेढ निर्माण करणारा मजकूर लिहिलेला आढळून आला.

तसेच शहरातील माळीवाडा परिसरातील पवन माळी व हाटदरवाजा परिसरातील सागर सुरेश लोहार या दोघांनीही दोन धर्मांत तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होण्यास कारणीभूत ठरू शकेल असा मजकूर लिहिलेले स्टेटस मोबाईलमध्ये ठेवून सोशल मीडियावर प्रसारित केले आहे. त्याची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार शहरातील चौघा युवकांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या दोन जणांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT