Solapur Crime News: मालकाच्या घरातून ड्रायव्हरने चोरले २१ तोळे सोनं; तपासात ६१ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

मालकाच्या घरातून ड्रायव्हरने चोरले २१ तोळे सोनं; तपासात ६१ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
Solapur Crime News
Solapur Crime NewsSaam tv

सोलापूर : मालकाच्‍या घरातून ड्रायव्हरनेच चोरी केल्‍याचे समोर आले आहे. या चोरी प्रकरणी ड्रायव्हरला अटक (Crime News) केल्यानंतर त्याच्याजवळ ५० लाख ९० हजार ५०० रुपयांची रोख रक्कम मिळून आली.

राहिलेले २१ तोळे दागिने त्याने सोलापुरातील (Solapur News) भाड्याच्या घरात जिन्याच्या फरशीखाली ठेवली होते; तेही काढून दिले. पैसे आणलेले रिकामे पोते गादीमध्ये लपवून ठेवले होते तेही काढून दिले. (Live Marathi News)

Solapur Crime News
Balasaheb Thorat: मोठी बातमी! बाळासाहेब थोरातांचा राजीनामा; कॉंग्रेसमध्ये मोठा भूकंप

मालकाबरोबर किरकोळ कारणावरून वाद झाला; म्हणून ड्रायव्हरने काटा काढण्याचा निर्णय घेतला. मालक परगावी गेल्याची संधी साधून त्याने घरातील ५० लाख ९० हजारांची रोख रक्कम व २१ तोळे सोने चोरून नेले होते. याप्रकरणी ड्रायव्हरला अटक केली होती. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता, सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

उमेश यादव असे अटक करण्यात आलेल्या ड्रायव्हरचे नाव आहे. उमेश यादव हा आशिष पद्माकर पाटोदेकर यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कामाला होता. गेल्या अडीच वर्षांपासून तो काम करीत होता. आशिष पाटोदेकर हे ३१ जानेवारीला कुटुंबीयांसमवेत कामानिमित्त पुणे येथे गेले होते.

Solapur Crime News
Mid Day Meal: मध्यान्ह भोजनात चक्क इडली सांबार; अनोख्या उपक्रमाचा इतर शाळांसाठी आदर्श

१ फेब्रुवारी रोजी पहाटे आशिष पाटोदकर घरी आले असता कपाटाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले ४५ लाख रुपये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. नंतर त्यांना २१ तोळे सोने आणि पाच लाख ९० हजार ५०० रुपयेही चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास केला असता त्यांच्याकडे कोणी नोकर काम सोडून गेला का? याची माहिती घेतली. तेव्हा १५ दिवसांपूर्वीच एका ड्रायव्हरला काढून टाकल्याचे सांगितले. त्याचे मोबाइल लोकेशन पाहिले असता तो सोलापुरात होता.

पोलिस आपल्या मागावर आहेत असे लक्षात आल्यानंतर तो पुण्याला गेला. पोलिसांनी तपास करीत सातारा- पुणे रोड गाठला. तेथे तो मिळून आला. रुमची तपासणी केली असता त्याच्याकडे रोख रक्कम ५० लाख ९० हजार ५०० रुपये मिळून आले. अटक करून सोलापुरात आणले तेव्हा त्याने घरात ठेवलेले २१ तोळे सोने काढून दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com