Nandurbar Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांची भटकंती; पाणी योजना अपूर्ण असल्याने प्यावे लागतेय दुषित पाणी

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील वांझळे गावात पाण्याची मोठी समस्या उद्भवलेली आहे. भर पावसाळ्यात गावातील आदिवासी महिलांना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून नदीच्या पात्रात झिरा करून अशुद्ध पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : केंद्र आणि राज्य सरकारने हर घर नल हर घर जल अर्थात जलजिवन मिशनचे काम सुरु केले. कामाला दीड वर्ष झाले तरी योजना पूर्ण होत नसल्याने नागरिकांना झऱ्याचे दुषित पाणी प्यावे लागत असल्याचे वास्तव नवापूर तालुक्यातील वांझळे गावात पाहण्यास मिळत आहे. योजना अपूर्ण असल्याने पावसाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर (Navapur) तालुक्यातील वांझळे गावात पाण्याची मोठी समस्या उद्भवलेली आहे. भर पावसाळ्यात गावातील आदिवासी महिलांना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून नदीच्या पात्रात झिरा करून अशुद्ध पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. अशुद्ध पाण्यामुळे गावातील अनेक नागरिकांना साथीच्या आजारांचा समाना करवा लागत आहे. हि अवस्था गेल्या (Water Crisis) दीड दोन वर्षापासून असून गावाची जलजिवन मिशनचे काम कधी पूर्ण होईल? असा सवाल गावातील महिला विचारत आहे.

नेते, अधिकाऱ्यांनी पाणी पिऊन दाखवा 
गावातील आदिवासी महिलांना सर्व कामे सोडून पिण्याचा (Nandurbar) पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. झिरो कोरून आणलेले जे पाणी पितो ते पाणी राजकीय नेत्यांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवावे. दिवस भरात झिरामध्ये जे पाणी गोळा होते, ते आम्ही आणतो आणि पितो. आमच्या गावातील जल जिवन मिशनचे काम करणारा ठेकेदार काम अपूर्ण सोडून गेला आहे. ते काम कधी पूर्ण होईल त्या ठेकेदारावर कारवाई कधी होणार? सर्व अधिकारी आणि नेते ठेकेदारांना पाठीशी तर घालत नाहीना असा प्रश्न या निमिताने उपस्थित केला जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Struggle: प्रसिद्ध अभिनेत्यावर आली बिकट वेळ; एकेकाळी पडद्यावर गाजला, आता रस्त्यावर विकतोय भाजी

चहाप्रेमींना मोठा झटका! साखर महागली अन् चहा कडवटला; कटिंगच्या कपाला दुप्पट भाव

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; RSS आणि पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

श्रावणात अळूची भाजी का खावी? जाणून घ्या अळूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Update: भिवंडी बायपासजवळ चोरीच्या उद्देशाने ट्रक चालकाची हत्या; १५० सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक

SCROLL FOR NEXT