Nandurbar News
Nandurbar News saam tv
महाराष्ट्र

मासेमारी करताना जाळ्यात अडकला; पाण्यात बुडून मृत्यू

दिनू गावित

नंदुरबार : नवापुर तालुक्यातील वागदी धरणात नेहमी मासेमारीसाठी येणाऱ्या व्‍यक्‍तीचा मासेमारी करताना जाळ्यात अडकला. जाळ्यात अडकल्‍याने पाण्यात बुडून सदर व्‍यक्‍तीचा मृत्यू (Death) झाल्‍याचा घटना उघडकीस आली. (nandurbar news wagdi dam caught in a net while fishing and Death by drowning)

साक्री (Sakri) तालुक्यातील भरत होळजू जगताप (वय ४५) हे मासेमारीसाठी वागद धरणात (Wagad Dam) येत होते. भरत जगताप हे साक्री तालुक्यातील खाटाळ आंबा येथील रहिवासी असून मासेमारी (Fishing) करून आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे रात्री ते वागदी येथील धरणात मासेमारी करण्यासाठी जाळे टाकत असताना अंधारात जाळ्यात अडकल्यानंतर खोल पाण्यात कडाक्‍याच्या थंडीने त्यांचा मृत्यू झाला आहे. मासेमारी करताना ते एकटेच असल्यामुळे त्यांना कोणीही वाचवू शकले नाही.

मोटारसायकलवरून उभी असल्‍याने आला संशय

भरत जगताप यांची मोटर सायकल धरणाबाहेर गेल्या दोन दिवसांपासून उभी होती. वागदी गावचे सरपंच किसन गावित यांना ह्या मोटरसायकलच्या संशय आल्‍याने त्‍यांनी विसरवाडी पोलिसांना (Police) याबाबत माहिती दिली. यानंतर तपास केला असता सदर व्यक्ती मासेमारीसाठी जाळे टाकताना जाळ्यात अडकून कडाक्याच्या थंडीने मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. विसरवाडी पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने सदर मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. याबाबत विसरवाडी पोलीस अधिक तपास करीत आहे. भरत जगताप यांच्या दुर्दैवी मृत्यूबाबत त्यांच्या परिवाराला विसरवाडी पोलिसांद्वारे माहिती देऊन कळविण्यात आल्याने घटनास्थळी दाखल झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha 2024 : मविआ आणि महायुतीच्या ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा; ४८ तासात हिशेब देण्याची सूचना

Khalistani Terrorist: हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणात 3 संशयितांना अटक; कॅनडा पोलिसांची कारवाई, भारतावर गंभीर आरोप

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

SCROLL FOR NEXT