Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Cibil Score Increase Tips: तुमच्या बँक खात्याचा सिबिल स्कोअर हा साधारण ७५० च्यावर असला तर तो चांगला मानला जातो. तुमचा स्कोअर इतका असला तर तुमचे बँक व्यवहार चांगले राहिलेत असा त्यामागील अर्थ असतो.
Cibil Score Increase Tips
Cibil Score Increase Tips

तुम्ही बँकेत पर्सनल लोन किंवा होम लोन घेण्यासाठी गेला असला तर बँकर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर विचारतो. तुमच्या बँक खात्याचा सिबिल स्कोअर किती आहे, याची माहिती घेतल्यानंतरच कर्ज मिळेल का नाही हे कळत असतं. कोणतेही कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोअर चांगलं असणं गरजेचं असतं. जर समजा कर्ज मिळालं तरी त्याचे व्याजदर हे जास्त असतात.

तुमच्या बँक खात्याचा सिबिल स्कोअर हा साधारण ७५० च्यावर असला तर तो चांगला मानला जातो. तुमचा स्कोअर इतका असला तर तुमचे बँक व्यवहार चांगले राहिलेत असा त्यामागील अर्थ असतो. बँकर त्याच नंबरवरती तुम्हाला कर्ज मिळवून देत असतो. परंतु कधी-कधी अनेकांचा सिबिल स्कोअर कमी असतो. कर्जाचा कुठला हप्ता किंवा क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले गेले नाही तर सिबिल स्कोअर कमी होत असतो. ७०० च्या खाली सिबिल स्कोअर गेला तर बँक तु्म्हाला कोणत्याचप्रकारचे लोन देत नाही.

ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर खाली गेलाय. त्याच्यासमोर सिबिल स्कोअर दुरुस्त करण्याचं मोठं आव्हान असतं. आपला सिबिल स्कोअर कसा व्यवस्थित करावं याची माहिती अनेकांना नसते. आज आपण या लेखात सिबिल स्कोअर कसा सुधारायचा याची माहिती घेऊया.

क्रेडिट स्कोअर ७०० पार कसा करायचा?

सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या स्कोअरवर निगेटिव्ह इम्पॅक्ट करणाऱ्या कोणत्या गोष्टी काय आहेत याची माहिती घ्या.

तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असण्यामध्ये तुमच्या क्रेडिट हिस्ट्री मधील विसंगती कारणीभूत असू शकते. विसंगतींचे निराकरण निराकरण केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकतो.

तुम्ही जर एखादे कर्ज फार पूर्वी फेडलेले असेल तर फेडलेल्या कर्जासाठी आणि तुम्हाला माहित नसलेल्या खात्यांसाठी तुमच्या अहवालाची तपासणी करा. यामध्ये काही चुकी असल्यास त्याचे निराकरण करा.

काही मोठ्या रकमेचे कर्ज घेतले असतील तर ते वेळेवर फेडा. क्रेडिट कार्डचा वापराचे प्रमाण कार्डच्या लिमिटच्या ३०% किंवा त्याहून कमी प्रमाणात ठेवा.

घेतलेल्या कर्जाचा ईएमआय वेळेवर भरा. जर तुम्ही ईएमआय वेळेवर भरला नाही तर तुमचा क्रेडिट स्कोअर घसरण्याची शक्यता वाढते. वाहन तसेच होमलोन सारखी मोठी कर्ज घेतली असतील तर त्या कर्जाची परतफेड करा.

क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याचे हप्ते वेळेवर भरा.क्रेडिट रिपोर्टमध्ये तुमच्या घरगुती वापराची बिल जसे म्हणजेच वीज, पाणी, गॅस किंवा फोन इत्यादी बिलांची माहिती यामध्ये समाविष्ट नसते. परंतु ही बिले देखील देय तारखेला भरणे गरजेचे असतं. जर बील वेळेवर भरले नाही तर बँकर तुमचा क्रेडिट अहवाल डिफॉल्ट रेकॉर्ड असल्याची नोंद करतो.

तुमचे कर्ज फेडण्याकरिता तुमच्याकडे रोख रक्कम नसेल तर तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. यात शिल्लक हस्तांतरण क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतात. तुमचे जुने कर्ज नवीन बॅलन्स ट्रान्सफर क्रेडिट कार्डवर घ्या. क्रेडिट लाईन वाढवण्याची विनंती करा.

तुमचा क्रेडिट रेशो त्वरित वाढवायचा असेल तर तुमची क्रेडिट लाईन वाढवणे खूप गरजेचे असते. जर तुम्ही वेळेवर पैसे भरत असाल आणि कर्जदाते क्रेडिट वाढवत असतात. क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी सातत्याने निरीक्षण करणे आणि त्यावर काम करणे खूप महत्त्वाचं असतं.

Cibil Score Increase Tips
New Rule Change From May: १ मे २०२४ पासून होणार अनेक महत्वाचे बदल; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com