नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाची संततधार सुरूच आहे. दरम्यान नवापूर तालुक्यातील खांडबारा आणि विसरवाडी पूर्व पट्ट्यातील गावांमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. यामुळे नदी नाल्यांना महापूर आला आहे. शेतांमध्येही पाणीच पाणी झाले आहे. (nandurbar news Visarwadi Khandbara East Patti torrential rains)
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील धडगाव, अक्कलकुवा, तळोदा (Taloda) तालुक्यांमध्येही पावसाचा जोर कायम असून नंदुरबार आणि शहादा तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमी आहे. या दोन तालुक्यांमध्ये अधून मधून पावसाची रिपरिप सुरू आहे. दरम्यान रविवारी अक्कलकुवा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर आज सकाळपासूनच नवापूर (Navapur) तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील मोरकरंजा, बर्डीपाडा, निमदर्डा या गावांसह विसरवाडी आणि खांडबारा परिसरातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
अनेक गावांचा संपर्क तुटला
नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना शेतीकाम करण्यासाठी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. नागन नदी, सरपणी आणि नेसू नदीला पूर आल्याने अनेक गावांच्या फरशी पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगावी; असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.