Nandurbar News Saam Tv
महाराष्ट्र

परिक्षेचा शेवटचा पेपर ठरला जीवनाचा अखेर; धरणात पोहताना दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

परिक्षेचा शेवटचा पेपर ठरला जीवनाचा अखेर; धरणात पोहताना दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात पोहायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा गाळात बुडून मृत्यू झाला. दोन युवकांचा मृत्यूने त्यांचा कुटुंबीयांनी जिल्हा रूग्णालय (Hospital) परिसरात एकच आक्रोष केला. शेवटचा पेपर त्यांचा आयुष्यासाठी अखेरचा ठरला. (nandurbar news Two students die while swimming in dam)

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची परिक्षा सुरू आहे. गुरूवारी (७ जुलै) शेवटचा पेपर होता. तो संपल्यानंतर पथराई (ता.नंदुरबार) येथील कल्पेश भगवान सोनवणे (वय २०) व (Nandurbar) नंदुरबार येथील दीपक सुनील वाकडे (वय २०) हे दोन्ही मित्रांसह ८ जण झराळी येथील विरचक धरणात पोहायला गेले होते. दुपारी साधारण तीन वाजेची वेळ होती. धरणात पाणीसाठा कमी झाला असून मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे.

गाळात पाय रूतला अन्‌ ते बुडाले

पोहण्याचा आनंद घेत असताना कल्पेश व सुनील या दोन्ही विद्यार्थ्यांच्या गाळात पाय रूतले. त्यानंतर ते पूर्णपणे गाळात बुडाले. त्यात त्यांचा दोघांचाही मृत्यू (Death) झाला. ही घटना सोबत असलेल्‍या विद्यार्थ्यांच्‍या लक्षात आली. त्यांनी पोलिसांनी माहिती दिली. पोलिस (Police) व बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. सायंकाळी पाचला दोघांचे मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीकरून मृत घोषित केले. दीपक हा पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांचा कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रांनी जिल्हा रूग्‍णालयात गर्दी केली होती. कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. रात्री उशिरापर्यंत नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Necklace Designs : गरबा लूकला चारचाँद लावतील 'हे' ७ नेकलेस डिझाइन्स, घागरा-चोळीसोबत नक्की ट्राय करा

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

SCROLL FOR NEXT