Nandurbar Water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Water Scarcity : थेंब थेंब पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष; नाल्यातून दूषित आणि खराब पाणी पिण्याची आदिवासी बांधवांवर वेळ

Nandurbar News : अक्राणी तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या तोरणमाळ परिसरातील केलापाणी या गावातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागत असल्याची परिस्थिती आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: एकीकडे अवकाळी पावसाचे थैमान तर दुसरीकडे सातपुड्यातील दुर्गम भागात थेंब थेंब पाण्यासाठी आदिवासी बांधवांचा जीवघेणा संघर्ष करावा लागत असल्याचे भीषण वास्तव पाहण्यास मिळत आहे. घोटभर पाण्यासाठी आपल्या चिमुकल्यांना घेऊन २०० फूट खोल दरीत उतरून तिथल्या नाल्यातून पिण्याचे पाणी ते ही दूषित पाणी आणावं लागत आहे. 

नळ चालू केला की आपल्या घरात लगेच पाणी येत ते ही विना मेहनीत. मात्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या अक्राणी तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या तोरणमाळ परिसरातील केलापाणी या गावातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागत असल्याची परिस्थिती आहे. थेंब थेंब पाण्यासाठी जंगलातून ३ ते ४ किलोमीटर पायपीट करत २०० फूट खोल दरीत उतरून पिण्यासाठी पाणी आणावं लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सकाळी उठल्यानंतर प्रथम पाण्याची चिंता 

केलापाणी गावातील आदिवासी बांधवांचा सकाळी उठल्यापासून पाण्यासाठीचा संघर्ष सुरु होतो. तब्बल ३ ते ४ किलोमीटर अंतरावरून जंगलातून वाट काढल्यानंतर घोटभर पाणी मिळते. हातात हंडे घेत आदिवासी महिला आपल्या लहान लेकरांना घेऊन २०० फूट खोल दरीत पाणी घेण्यासाठी उतरतात. दरीत असलेल्या झऱ्यातून पाणी मिळत खर पण ते दूषित आणि गढूळ. याच पाण्याने या बांधवांना पाण्याची तहान भागवावी लागत आहे. उन्हाळ्याच्या सुट्या असल्या तरी या आदिवासी बालक आपल्या आई वडिलांसोबत पाणी साठी संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत.

अन्य सुविधांचाही अभाव 

अक्राणी तालुक्यातील केलापाणी हे गाव सातपुड्याच्या कोपऱ्यात वसलेल्या गावाची लोकसंख्या पाचशे आहे. मात्र या गावाला स्वातंत्र्य काळापासून आज रस्ते, वीज, नेटवर्क, आरोग्य सुविधा आणि पाण्याची सुविधा आजही उपलब्ध नाही. परिणामी इथल्या आदिवासी बांधवांना जिवंतपणी मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. या आदिवासी बांधवांच्या यातना राज्याचे आदिवासी मंत्र्यांनी तरी समजून घ्यावी अशी अपेक्षा हे आदिवासी बांधव करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक-मालेगावात उन्हाचा तडाखा, तापमान ४३ अंशांच्या पार

Explainer: एका वर्षापर्यंत सोनं खरेदी करू नका! पीएम मोदींनी असं का केलं आवाहन, गोल्डमुळे अर्थव्यवस्थेचं कसं होतंय नुकसान?

Kutra Chavlyavar Upay: कुत्रा चावल्यावर काय करावे? घरगुती उपाय वाचा

Post Office Scheme: दिवसाला ३३३ रुपये गुंतवा अन् ₹१७००००० मिळवा; पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना

MIM नगरसेवकाचे पद रद्द होणार? छत्रपती संभाजीनगरचं राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT