Nandurbar News Udhana Railway
Nandurbar News Udhana Railway Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: उधना जाणाऱ्या रेल्वेची संख्‍या वाढणार; स्थानकावरील प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : उधना येथे सुरू असलेल्या नवीन तीन व चार क्रमांकाच्या प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम होत आहे. यामुळे उधना– जळगाव (Jalgaon) अनेक रेल्‍वे बंद होत्‍या. परंतु, प्‍लॅटफार्मचे काम झाल्‍याने या रेल्‍वेगाड्या पुन्‍हा सुरू झाल्‍या आहेत. (Tajya Batmya)

नंदुरबार मार्गे जळगाव जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या बंद होत्या. मात्र उधना येथील तीन आणि चार नंबरच्या प्लॅटफॉर्म तयार झाला असून आता तीन मार्चपासून रेल्वे सुरळीतपणे सुरू झाल्या आहेत. नवीन प्लॅटफॉर्म तयार झाल्याने जळगावकडून येणाऱ्या रेल्वेगाड्या लवकर उधना स्थानकावर पोहचणार आहेत. याचा सर्वाधिक फायदा नंदुरबार जिल्ह्यातील प्रवाशांना होणार आहे. नवीन प्लॅटफॉर्म तयार झाल्याने रेल्वेची संख्या देखील अधिक वाढणार आहे.

प्रवाशांना फायदा

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील अनेक नागरिक कामानिमित्त दररोज सुरत– उधना ये– जा करत असतात. त्यांच्यासाठी वेळेवर पोहोचणं महत्त्वाचं असते. त्यामुळे सर्वाधिक रेल्वेचा प्रवास करत असतात. तर दुसरीकडे खाजगी वाहनधारक अव्वाच्या सव्वा भाड आकारात असल्‍यामुळे रेल्वेने अधिक प्रवास केला जात असतो. त्यामुळे सुरुवातीचा तयार करण्यात आलेल्या प्लॅटफॉर्ममुळे नंदुरबार जिल्ह्यातील सोबतच जवळ असलेल्या धुळे जिल्ह्यातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी; जमिनीत पुरली ११ लाख रुपयांची लाकडं

SCROLL FOR NEXT