Nandurbar News 
महाराष्ट्र

Nandurbar: याला म्हणायचं नाद! नवरा-नवरीची लग्नमंडपात चक्क हेलिकॉप्टरने एन्ट्री, आगळ्यावेगळ्या लग्नाची गावभर चर्चा

ग्रामीण भागात पहिल्यांदाच असा विवाह सोहळा रंगल्याने बघ्यांनी तौबा गर्दी केली होती.

Gangappa Pujari

सागर निकवाडे, नंदुरबार...

Nandurbar: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा आणि आनंदाचा क्षण मानला जातो. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील हा दिवस आणखी खास प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करत असतो.सध्या नंदुरबारमधील अशाच एका आगळ्या वेगळ्या लग्नाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

या लग्नात नवरा नवरीने चक्क हेलिकॉप्टरने एन्ट्री घेतली. ज्यामुळे या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, हौशेला मोल नसते असाच काहीसा विषय नंदुरबार येथे झाला आहे. याला कारण म्हणजे वधु वराने लग्न मंडपात येण्यासाठी थेट हेलिकॉप्टरमधून केलेली एन्ट्री. फळे व्यापारी मोहिनीराज राजपूत यांचा मुलगा चि. हंसराज आणि चि.सौ.कां रितिका यांच्या आज विवाह सोहळा पार पडला.

आपल्या मुलाच्या विवाहानिमित्ताने वधु वराच्या हवाई मिरवणुकीसाठी खास हेलीकॉप्टर सफारीचे आयोजन केले होते.

नंदुरबार सारख्या अतिदुर्गम भागात देखील हेलिकॉप्टर मधून वर आणि वधू दाखल झाल्याची घटना पहिल्यांदाच घडत असल्याने पाहणाऱ्यांची मोठी गर्दी केली .शहरातल्या जीटीपी महाविद्यालयाच्या मैदाणावरुन नाघलेल्या या आगळ्या वेगळ्या वरवधुंची मिरवणुक पाहण्यासाठी बघ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

या विवाह सोहळ्याची सध्या माध्यमांमध्ये तसेच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. आत्तापर्यंत लग्नात नवरदेवाने केलेली बुलेटवरील एन्ट्री किंवा नवरीने डान्स करत केलेली एन्ट्री पाहिली असेल, मात्र हेलिकॉप्टरने एन्ट्री घेणे विरळच, त्यामुळे हौसेला मोल नाही, अशीच प्रतिक्रिया सध्या उमटू लागली आहे. (Nandurbar News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT