Surat Police Saam tv
महाराष्ट्र

Surat Police : सासऱ्याने सुनेची केली पोलखोल; हॉटेलवर रंगली होती दारू पार्टी, सुरत पोलिसांच्या छापेमारीत सुनेसह ५ जण ताब्यात

Nandurbar News : सुरतमधील एका हॉटेलमध्ये मित्र- मैत्रिणी मिळून पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सून जात असल्याबाबत सासऱ्याला समजल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी छापेमारी करत कारवाई केली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: गुजरात राज्यातील सुरतमधील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय- प्रोफाईल दारू पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत सहा जणांना अटक केली आहे. या कारवाईमागे एक धक्कादायक कौटुंबिक कहाणी समोर आली आहे. यात सासऱ्याने आपल्या सुनेवर पाळत ठेवून पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा पर्दाफाश झाला आहे. 

सुरत शहरातील डुमस भागातील 'विकेंड ॲड्रेस' हॉटेलच्या रूम नंबर ४४३ मध्ये फ्रेंडशिप डे आणि वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू होतं. यात चार तरुण आणि दोन तरुणी सहभागी झाल्या होत्या. या पार्टीची माहिती पोलिसांना त्याच पार्टीतील एका तरुणीच्या सासऱ्याने म्हणजेच किरण पटेल यांनी दिली. सून नुकतीच कॅनडाहून परतली आहे. तिच्यावर पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव असून ती सतत पार्ट्यांमध्ये सहभागी होत असल्याचा आरोप होता. हाच संशय आल्यामुळे त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली आणि ती दारू पार्टी करत असल्याची माहिती पोलिसांना दिली.

सहा जणांना घेतले ताब्यात 
दरम्यान पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी सर्वजण दारूच्या नशेत होते. याठिकाणाहून पोलिसांनी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. तसेच सहाही जणांना ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. 

सासऱ्याकडून सुनेवर गंभीर आरोप 
घटनेमागे सासरे आणि सुनेमधील कौटुंबिक वाद असल्याचेही समोर आलं आहे. किरण पटेल यांनी सुनेवर आणखी काही गंभीर आरोप केले आहेत. लग्नापूर्वी तिच्या कुटुंबीयांनी तिच्या मागील दोन मोडलेल्या साखरपुड्यांची माहिती दिली नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. तसेच, कॅनडामध्ये मुलगा आणि सुनेमध्ये वाद झाल्यामुळे सून भारतात परतली असून तिने घटस्फोटाची नोटीस पाठवली, अशी माहितीही त्यांनी दिली. या घटनेमुळे कौटुंबिक कलह आणि सामाजिक मूल्यांमधील संघर्षावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं; वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT