Nandurbar News
Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: धावत्या बसमध्ये प्रवाशाचा अचानक मृत्यू, नंदूरबारमधील धक्कादायक घटना

Chandrakant Jagtap

Nandurbar News: नंदूरबारमध्ये धावत्या बसमध्ये प्रवाशाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शहादा येथून धडगावच्या दिशेने जात असलेल्या बसमधील 79 वर्षाच्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. ही घटना खामला गावाजवळ बस घाटातून जात असताना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेली व्यक्ती शहादाच्या दिशेने येणारी धडगाव बसमध्ये दरा गावातून बसली होती. बस घाटातून प्रवास करत असतात या वयोवृद्ध व्यक्तीची तब्बेत बिघडली. हे कळताच बसमधील वाहक यांनी तात्काळ बस मांडवी प्राथमिक उपचार केंद्रावर थांबवली आणि डॉक्टमार्फत त्यांची तपासणी केली. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत्यू झाल्याची माहिती दिली.

दरम्यान या व्यक्तीचा मृतदेह धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सिंगा पाडवी असं मृत वयोवृद्ध व्यक्तीच नाव असून शहादा तालुक्यातील पिंपरापाणी येथील ते रहिवासी आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान वृद्धविकाराने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Latest Marathi News)

परभणीत दुचाकी अपघातात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

परभणीत दुसऱ्या एका घटनेत दुचाकी अपघातात एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. वालुरहुन सेलूकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या तरुण शेतकऱ्यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. आसाराम जईद असे या 29 वर्षीय शेतकऱ्याचे नव आहे. आसाराम नेहमी प्रमाणे शेतातील भाजीपाल्या विक्रीसाठी वालुरहून सेलूकडे दुचाकीने जात होते. राजवाडी शिवारात त्यांच्या दुचाकीला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी दिली आहे. ()

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ 28 उमेदवारांचे अर्ज वैध

Amrita Pandey च्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा

Udayanraje Bhosale Acting | भर मंचावरुन उदयनराजे भोसले यांनी Shashikant Shinde यांची नक्कल केली?

Gopichand Padalkar On Sharad Pawar | "साडेतीन जिल्ह्यांचे नेते.." पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

SCROLL FOR NEXT