Akkalkuwa News Saam tv
महाराष्ट्र

Akkalkuwa News : शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत; नदीला पूल नसल्याने झाडाची फांदी पकडत काढतात मार्ग

Nandurbar News : शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज नदी ओलांडावी लागते. नदीवर कोणताही पूल नसल्याने मुले झाडांच्या फांद्या पकडून नदी पार करतात. पावसाळ्यात नदीला पूर येतो, तेव्हा त्यांच्या शिक्षणात खंड पडतो

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
:  दुर्गम भागात आजही रस्त्यांची समस्या प्रकर्षाने जाणवून येत आहे. रस्त्याअभावी रुग्णांना पायपीट करत कसरत करून मार्ग काढावा लागत असल्याचे सातत्याने समोर येते. तर आता विद्यार्थ्यांना देखील शाळेत जाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचे आता समोर आले आहे. शाळेत जाण्यासाठी नदी पार करावी लागत असल्याने या नदीवर पूल नसल्याने झाडांच्या फांद्या पकडून मार्ग काढावा लागत आहे.  

अक्कलकुवा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गंगापूर अंतर्गत गुलीआंबा महसूल गावातील केलखाडी पाड्यातील ही गंभीर समस्या आहे. या पाड्यात अजूनही रस्त्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज नदी ओलांडावी लागते. नदीवर कोणताही पूल नसल्याने ही मुले झाडांच्या फांद्या पकडून नदी पार करतात. पावसाळ्यात नदीला पूर येतो, तेव्हा त्यांच्या शिक्षणात खंड पडतो. काहीवेळा मुले नदीकाठावरच थांबतात किंवा शाळा गाठता येत नाही. 

पाय घसरून पडण्याची भीती 

केलखाडी पाड्यातील विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत धरावा लागत आहे. या दररोजच्या धोकादायक प्रवासात विद्यार्थ्यांना अनेक वेळा पाय घसरून पडण्याचा, वाहत्या पाण्यात वाहून जाण्याचा धोका असतो. तरीही शिक्षणाची आस न सोडता ही मुले रोज शाळेत जातात. या भागात रस्त्याचा अभाव इतका गंभीर आहे की, आजारी रुग्णांना देखील बांबुलंसच्या माध्यमातून दवाखान्यात नेले जाते. 

ग्रामस्थांकडून पुलाची अनेकदा मागणी 

दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी रस्ता आणि पुलाच्या मागणीसाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. मात्र, अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. या मुलांचा शिक्षणाचा हक्क सुरक्षित करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्ता आणि सुरक्षित पुलाची उभारणी करावी, अशी मागणी आता गावकऱ्यांतून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; २४k, २२k, १८k सोन्याची प्रति तोळा किती किंमत? वाचा ताजे दर

IPL 2026: 1...2...3 नाही तर तब्बल 11 चेंडू; अर्शदीप सिंगने हद्दच केली, फेकली सर्वात मोठी ओव्हर

Dhurandhar 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा जलवा; 'धुरंधर २' ची १३ दिवसात १५०० कल्बमध्ये एन्ट्री

Maharashtra Live News Update: अशोक खरातच्या मुलाची काल रात्री चौकशी

Crime News: घरात पतीचा मृतदेह दिसताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; इंजिनिअर जोडप्याच्या मृत्यूनं परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT