सायकल रॅली
सायकल रॅली 
महाराष्ट्र

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्‍या सायकल रॅलीचे शहाद्यात स्‍वागत

दिनू गावित

नंदुरबार : भारतीय स्वातंत्र्याच्या अंमृत महोत्सव वर्षानिमित्त निघालेल्या केंद्रिय राखीव पोलीस दलातर्फे गडचिरोली ते केवडिया स्टॅच्यू ऑफ युनिटी (गुजरात) अकराशे किलोमीटर प्रवास सायकल रॅलीतून एकतेचा संदेश देत आहे. या सायकल रॅलीचे नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील ग्रामस्थांच्यावतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. (nandurbar-news-shahada-Welcome-to-the-martyrdom-rally-of-Central-Reserve-Police-Force-Cycle-Rally)

भारतीय स्वातंत्र्याचा अंमृत महोत्सव साजरा केला जात असून सरकारने सन २०२१ हे एकात्मता वर्ष घोषीत केले आहे. या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या गडचिरोली युनिटच्यावतीने गडचिरोली ते केवडीया (गुजरात) येथील स्टॅच्यु ऑफ युनिटी ११०० किमीपर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे उद्घाटन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते १२ ऑक्टोबरला करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातुन केवडिया स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातकडे रवाना झाली.

९० जवानांचा सहभाग सर्वांचे स्‍वागत

रॅलीत एकूण ९० जवान सहभागी असून २५ जवान सायकलिस्ट आहेत. या रॅलीचे नेतृत्व असि. कमांडर चेतन शेलोटकर हे करीत आहेत. विविध परंपरेने नटलेल्या भारत देशात एकता निर्माण एकतेचा संदेश देण्यासाठी या सायकल रॅलीचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांच्या सुरक्षेसाठी चिमुकली उतरली रस्त्यावर! हृदयस्पर्शी संदेशातून करतेय हेल्मेट वापरण्याचं आवाहन; सुंदर VIDEO

Today's Marathi News Live : सोलापुरात स्मार्ट सिटीच्या पाईपांना भीषण आग

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

RCB Vs GT : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- गुजरात टायटन्स भिडणार; आकडेवारी प्रत्येकाला थोडी चक्रावूनच टाकणारी!

SCROLL FOR NEXT