नशा भागविण्यासाठी तरूणाई करतेय या गोष्‍टींचा वापर; ग्रामीण भागातही वाढले प्रमाण

नशा भागविण्यासाठी तरूणाई करतेय या गोष्‍टींचा वापर; ग्रामीण भागातही वाढले प्रमाण
नशा
नशा

चाळीसगाव (जळगाव) : वाळू, गांजा, गुटखा तस्करीमुळे चाळीसगावचे नाव सर्वदूर पोहचले असतांना आता तरुणाईचे आयुष्य उद्धवस्त करण्याचा व्यसनाचा भयंकर प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी कुत्ता गोळीचा बोलबाल असतांना आता नशा भागवण्यासाठी चक्क फेव्हिक्विक, बॉंड व स्टीकफास्ट यांचा सर्रास वापर केला जात आहे. विशेषत: ग्रामीण भागात हा प्रकार घडत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आपला पाल्य कुठल्या नशेच्या आहारी तर गेला नाही ना याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. (jalgaon-news-use-of-these-things-by-the-youth-to-satisfy-the-intoxication)

खरे तर तरुणाई आपल्या देशाची संपत्ती आहे. पण या संपत्तीलाच आता कीड लागण्याचा प्रकार घडत आहेत. गरीब घरचा मुलगा असो की मध्यमवर्गीय वा सधन वर्गातील तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेला दिसत आहे. व्यसन हे तरुणाईचे स्टाईल स्टेटमेंट बनले आहे. मात्र तेच व्यसन त्याच्या आयुष्यात अंधार करणारे ठरत आहे. विशेष म्हणजे शहरी भागाचे हे लोण आता ग्रामीण भागातही पोहचले आहे.

व्हाईटनर, फेविक्विकची गोड नशा

गांजा, दारू, गुटखा हे नशेचे प्रकार असले तरी आणि त्याची चाळीसगाव तालुक्यात ददात नसली तरी अलीकडे मात्र व्हाईटनर, बॉण्ड, फेविक्वीक यांची नशा तरुण वर्गाकडून केली जात असल्याचे हादरवणारे वृत्त आहे. ग्रामीण भागात अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी हे आगळ्या वेगळ्या नशेच्या गर्देत सापडले आहेत. नशेच्या गर्देत सापडले असून नशाहीन विद्यार्थी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतानाचे चित्र शहरात सध्या पहावयास मिळत आहे. व्हाईटनर, बॉण्ड, फेविक्वीट हे प्लास्टीक थैलीत टाकून ते हाताने घासून त्याचा फुगा केला जातो व तो फुगा तोंडाला लावून जोरात आत पोटात श्वास घेतला जातो. या श्वासाद्वारे नशेची किक मिळत असल्याचा अनुभव येतो. विशेष म्हणजे गांजा व अन्य तत्सम नशाकारक वस्तु महाग असल्याने अनेक गरीब तरुणांना घेणे परवडत नाही. पण पाच दहा रूपयाला मिळणारे व्हाईटनर, बॉण्ड, फेविक्वीक विकत घेतले की झाली नशा या नशेचा अंमल तरूणाईमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

नशा
धुळ्यातील दिव्यांनी उजळणार इंग्लंड, अमेरिका व ऑस्ट्रेलिया!

ग्रामीण भागात ही नशा आली कुठून?

विशेष म्हणजे नशेचा हा प्रकार ग्रामीण भागात आला कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक तरूण या जीवघेण्या नशेच्या आहारी गेले असून वारंवार या प्रकारची नशा करीत असल्याने ते वेगळ्याच जगात वावरत असल्याचे दिसून येते. हे तरूण शहरात शिक्षणासाठी येत असल्याने शहरातही त्याचा फैलाव झाल्यास नवल नाही. किराणा दुकान, जनरल स्टोअर्समधून फेविक्वीक, बॉण्ड व व्हाईटनर सर्रास विक्रीसाठी ठेवल्या जात आहे. ते कोणास द्यावे याचे निर्बंध नसल्याने तरूण सहजतेने मिळवितात. मात्र ही नशा एवढी गंभीर आहे की, एकदा व्यसन लागले की ते सहजा सहजी सुटत नाही. नशा केली नाही तर ती व्यक्ती बैचेन होऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याची श्नयता नाकारता येत नाही गेल्या काही दिवसापासून हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे बोलले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com