Nandurbar News
Nandurbar News Saan tv
महाराष्ट्र

फरशी पूल तुटल्याने वाहतुक विस्कळीत; बस बंदमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

दिनू गावित

नंदूरबार : शहादा तालुक्‍यातील पाच– सहा गावांना जोडणाऱ्या रस्‍त्‍यावरील पूल तुटल्‍याने वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. लहान वाहने पुलावरून पास होत असली तरी मोठी अवजड वाहनांची वाहतुक ही धोकेदायक आहे. मुख्‍य म्‍हणजे शाळा (School) सुरू झाल्‍याने विद्यार्थी शाळेत जात आहेत. पुलामुळे बस (St Bus) बंद झाल्‍याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. (nandurbar news shahada Broken bridge disrupts traffic)

जिल्ह्यातील शहादा (Shahada) तालुक्यातील मौजे कुढावद ते भुतेआकसपूर रस्त्यावरील फरशी पूल दुरुस्त करण्याबाबतची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. शहादा तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी लिंबर्डी, सातपिंपरी, नवलपुर, अंबाबारी, कुढावद ते भुतेआकसपूर अशा पाच ते सात गावांना जोडणाऱ्या (Nandurbar News) रस्त्यावरील फरशी पूल तुटल्याने राज्य परिवहन महामंडळाची बस लिंबर्डीपर्यंत पोहोचत नसल्याने पाच गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच रात्रीच्यावेळी फरशी पुलावर मोठे वाहन गेल्यास मोठा अपघात होऊन आर्थिक व जीवित हानी होण्याची शक्यता असल्याने पाच गावातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सदर पूल व रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

मुसळधार पावसात वाहून जाण्याची शक्‍यता

मुसळधार पावसात पाण्याच्या प्रवाहात सदर फरशी पूलाचे अधिक नुकसान होऊन गावांचा संपर्क तुटू शकतो. त्यात शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ सदर पूल व रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Accident : भीषण अपघात; कारच्या धडकेत आईसह दोन मुले व भाच्याचा मृत्यू

Mangalsutra Designs: अक्षय्य तृतीयेला खरेदी करा मंगळसूत्राच्या या आकर्षक आणि नाजूक डिझाइन

Wasim Akram Statement: 'विराटचं हे चुकलंच..' कोहली- गावस्कर वादात वसीम अक्रमची उडी!

Akot-Shegaon Highway : अकोट-शेगाव महामार्ग म्हणजे मृत्यूच्या वाटेवर प्रवास; रस्त्यावर मोठ-मोठ्या भेगा, पाहा VIDOE

Leopard Attack: जुन्नर हादरलं! अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; दीड महिन्यातील तिसरी घटना

SCROLL FOR NEXT