Nandurbar Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Water Crisis : पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष; २०० फूट खोल दरीतून महिला आणताय पाणी; अक्राणी, अक्कलकुवा तालुक्यात भीषण पाणीटंचाई

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात मार्च महिन्यातच पाणी टंचाईची समस्या जाणविण्यास सुरवात झाली आहे. तीव्र उन्हात पायपीट करत डोक्यावर पाणी आणण्याची वेळ महिला, नागरिकांवर आली आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील किती दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्याला सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी जीव धोक्यात टाकावा लागत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. प्रामुख्याने महिला दोनशे फूट खोल दरीत उतरून पाणी आणत आहेत. 

नंदुरबार जिल्ह्यात मार्च महिन्यातच पाणी टंचाईची समस्या जाणविण्यास सुरवात झाली आहे. तीव्र उन्हात पायपीट करत डोक्यावर पाणी आणण्याची वेळ महिला, नागरिकांवर आली आहे. यात आता नंदुरबारच्या अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यात अधिक भीषणता जाणवायला सुरवात झाली असून सातपुड्याची पायथ्यात वसलेल्या तालुक्यातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.  

खोल दरीत उतरून आणताय पाणी 

अक्कलकुवा व अक्राणी या दोन्ही तालुक्यात भीषण चित्र पाहण्यास मिळत आहे. शंभर ते दोनशे फूट खोल दरीत उतरून पाणी घेण्याची वेळ आदिवासी महिलांवर आली आहे. त्या सोबतच अनेक भागात रस्ते नसल्यामुळे चार ते पाच किलोमीटर पाण्यासाठी पायपीट देखील आदिवासी महिलांना करावी लागत आहे. मात्र या दोघा तालुक्यांना लागून नर्मदा नदी आहे. मात्र नर्मदा नदीचा एक थेंब पाणी देखील या भागासाठी वापरता येत नसल्याचं दुर्दैवी परिस्थिती आहे.

आमदारांचा ठेकेदारांना अल्टिमेटम 
दुर्गम भागात सुरू असलेल्या जलजीवन मिशनचे काम निष्कृष्ट दर्जाचे असून बोगस पद्धतीने काम केले जात असल्याचा आरोप आमदार आमश्या पाडवी यांनी केला आहे. येत्या १५ दिवसात ठेकेदारांनी जल जीवन मिशनचे काम पूर्ण न केल्यास ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून पैसे वसूल करणार असल्याचा इशारा आमदार आमश्या पाडवी यांनीं दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : आज काय बनवायचं? हा प्रश्न आता कायमचा बंद, 'हा' घ्या तुमच्या महिन्याभराचा मेनू प्लॅन

Kolhapur : दबक्या पावलाने आले अन् कुटुंबासह कुत्र्यावर फवारलं गुंगीचं औषध, कोल्हापूरमध्ये चोरट्यांनी लाखोंवर हात साफ केला

Dating App: भयान वास्तव! डेटिंग अ‍ॅपवरचे ६५ टक्के युजर्स विवाहित अन् कमिटेड

Blouse Designs: जाड अन् बारीक अंगानुसार ब्लाऊज कसा निवडायचा?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक

SCROLL FOR NEXT