Fraud Case : नामांकित कंपनीचे बनविले बनावट लेटरहेड; शेतकऱ्याची २७ लाख रुपयात फसवणूक

Yavatmal News : बायो चुला प्रकल्प चालू करण्यासाठी कंपनीचे बनावट लेटरहेड वापरून फसवणूक केली. ६ जून २०२४ यातील आरोपी प्रतीककुमार सिंग याने एचपीएल, ईईएसएल या कंपनीच्या नावाने बनावट लेटरहेड तयार केले.
Fraud Case
Fraud CaseSaam tv
Published On

यवतमाळ : फसवणुकीचे अनेक प्रकार सातत्याने घडत आहेत. अशातच यवतमाळमध्ये एका शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्याचे समोर आहे आहे. या प्रकरणात एका नामांकित कंपनीचे लेटरहेड बनवून शेतकऱ्याची तब्बल २७ लाखांनी फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी यवतमाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

बायो चुला प्रकल्प चालू करण्यासाठी कंपनीचे बनावट लेटरहेड वापरून शेतकरी योगेश कांबळे यांची फसवणूक करण्यात आली आहे. दरम्यान योगेश कांबळे यांची युवा शक्ती विकास बहुउद्देशीय विकास संस्था आहे. तर त्यांचा मावस भाऊ मनोज भास्कर भगत (रा. महागाव) यांच्या माध्यमातून रायपूर येथील प्रतीककुमार सिंग यांच्यासोबत ओळख झाली होती. ओळखीतून प्रतीककुमार सिंग यांनी बायो चुला प्रकल्प तसेच इतर सामाजिक कामांचे प्रलोभन शेतकरी कांबळे यांना दिले. 

Fraud Case
Banana Price : अवकाळीच्या नुकसानीनंतर केळी उत्पादकांना दिलासा; सरासरी दीड हजार रुपयांपर्यंत दर

प्रकल्पासाठी बनावट लेटरहेड 

अनेकांना कामे दिले असून त्याबाबतची कागदपत्रे सुद्धा दाखविले. यावर योगेश कांबळे यांनी विश्वास ठेवून बायो चूल प्रकल्प घेण्यास तयारी दर्शविली. यासाठी यवतमाळ शहरातील एसबीआय बँकेतून ६ जून २०२४ यातील आरोपी प्रतीककुमार सिंग याने एचपीएल, ईईएसएल या कंपनीच्या नावाने बनावट लेटरहेड तयार केले होते. यासोबत भारतीय श्रम सहकारी समिती लिमीटेड, अभिमन्यू सोशल वेलफेअर चॅरिटेबल फाऊंडेशन, असे लेटरहेड वापरले होते. 

Fraud Case
Ashok Chavan : काँग्रेसचे नेतृत्व दिशाहीन म्हणून लोक स्वतःहून दुसऱ्या पक्षात जाताय; खासदार अशोक चव्हाण यांचा हल्लाबोल

पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान प्रकल्प उभारणीसाठी शेतकरी योगेश कांबळे यांनी प्रतीककुमार सिंग याने सांगितल्यानुसार रक्कम दिली होती. कालांतराने प्रकल्पाचे काम होत नसल्याने योगेश कांबळे यांनी केलेल्या पाहणीत सर्व लेटरहेड बनावट आणि खोटे असल्याचे समोर आले आहे. यानंतर कांबळे यांनी यवतमाळ शहर पोलिसात जात या प्रकरणी तक्रार दिली असून प्रतीककुमार सिंग याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com