Nandurbar Crime Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime : स्त्रियांचा वेष करत टाकला दरोडा; ५ किलो चांदी लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद

Nandurbar News : नंदुरबार शहरात आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत चोरट्यानी महिलांच्या ड्रेस परिधान करून आलेले दोघं चोरट्यांनी दुकानाच्या सेटर तोडत आतमध्ये प्रवेश

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : चोरी करण्याचा संपूर्ण प्लॅनिंग करून चोरट्यानी अगोदर स्त्रियांचे कपडे परिधान केले. यानंतर सोनाराचे दुकान फोडून तब्बल ५ किलो चांदी घेऊन फरार झाल्याची घटना नंदुरबार शहरातील उड्डाणपुलाजवळ असलेल्या एका गुरुकृपा सिल्वर या दुकानात घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 

नंदुरबार (Nandurbar) शहरात आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत चोरट्यानी महिलांच्या ड्रेस परिधान करून आलेले दोघं चोरट्यांनी दुकानाच्या सेटर तोडत आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी तिजोरीत ठेवलेले ४ लाख रुपये किमतीचे ५ किलो चांदी आणि त्यासोबतच चांदीला आकार देण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. सोनाराच्या दुकानात पहाटेच्या सुमारास झालेली चोरीची घटना (CCTV) सीसीटीव्ही कैद झाली आहे. 

पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु 

दरम्यान सकाळी चोरी झाल्याची घटना समोर आली. या घटनेबाबत (Police) पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असता श्वान पथकाचा माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. या सोबतच संबंधित सीसीटीव्ही कॅमेरा तपासणी करत नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल का करण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : युद्धाच्या पार्श्वभूमीवर CM देवेंद्र फडणवीसांचा महत्वाची बैठक; काय निर्णय घेणार?

Income Tax Return: उरले शेवटचे २ दिवस! अपडेटेड ITR भरण्याची शेवटची तारीख आली जवळ ; करदात्यांनो हे काम आज करा अन्यथा भरावा लागेल दंड

Maharashtra Live News Update: Mumbai : सी लिंकच्या एक्झिट टोल नाक्यावर कारचालकाला मारहाण

होर्मुझवरून इराण करतंय जगाची नाकेबंदी? एका जहाजासाठी 18 कोटींचा टोल?

Constipation: सकाळी 1 मिनिटांत पोट होईल साफ, फक्त फॉलो करा ही सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT