Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: गोरसेनेकडून रास्ता रोको; नंदुरबारच्‍या नवापूर चौफुलीवर आंदोलन

गोरसेनेकडून रास्ता रोको; नंदुरबारच्‍या नवापूर चौफुलीवर आंदोलन

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : विमुक्त जाती या प्रवर्गातील खोटे राजपूत यांची अवैध घुसखोरी कायमस्वरूपी रोखन्यात यावी आणि राजपूत भामटा जातीतून भामटा शब्द हटविण्यात येऊ नये; या मागणीसाठी आज नंदुरबार (Nandurbar) शहरातील नवापूर चौफुली येथे गोरसेनेच्‍यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Live Marathi News)

राजपूत, छ्प्परबंद, परदेशी अश्या बिगर मागास वर्गीय जातीच्या लोकांकडून प्रवर्गात होत असलेली अवैध घुसखोरी (Rasta Roko) कायमस्वरूपी रोखण्यात यावी. अवैधरित्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर व लाभार्थ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. तसेच अवैध जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे. जात पडताळणी समिती- जात वैधता पडताळणी समितीवर गोर बंजारा समाजाचा प्रतिनिधी नेमण्यात यावा.

ज्याठिकाणी गोर बंजारा समाज वास्तव्याला नाही. तेथे प्रवर्गातील कुठल्याही व्यक्तीला जात वैधता पडताळणी समितीवर प्रतिनिधी म्हणून नेमण्यात यावे. मूळ राजपूत भामटा वास्तव्याला होते, त्या गावच्या नावाची जातीनिहाय यादी दरवर्षी करण्यात यावी. अश्या विविध मागण्यांसाठी नंदुरबारमध्‍ये आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या मागण्यांवर कारवाही झाली नाही; तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा ईशारा गोरे सेनाच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड विरूद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT