Nandurbar Taloda News
Nandurbar Taloda News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: दरीतून झोळी करून रुग्णांना नेणाऱ्या गावात होणार रस्ता; प्रशासनाने घेतली दखल

दिनू गावित

नंदुरबार : सातपुडा दुर्गम भागातील कुयलीडाबर गावात रस्ता नसल्याने गेल्या आठवड्यात गरोदर मातेला प्रसूतीकरिता डोंगरदऱ्यातून बांबूची झोळी करून जीवघेणा प्रवास करत असल्याचा धक्कादायक (Nandurbar News) प्रकार समोर आला होता. यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. आता या गावात जाण्यासाठी रस्‍ता तयार केला जाणार आहे. (Nandurbar Taloda News)

तळोदा (Taloda) तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील कुयरीडाबर ते केलवापाणी चार किलो मीटर दुर्गम रस्त्याचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून संबंधित यंत्रणेने पाहणी केली असून रस्त्यासाठी साधारण दहा कोटी रुपयांचा निधी खर्च करून रस्ता तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतल्यानंतर कुयरीडाबर व पालाबार आदिवासी पाड्यांवरील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. लवकरच या संदर्भात प्रस्ताव तयार करून कामाला गती देण्यात येईल अशी माहिती गावाला भेट देणारे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कनिष्ठ अभियंता भूषण भामरे, दिवान सूर्यवंशी यांनी दिली आहे.

सहा किमी पायपीट

तळोदा तालुक्यातील कुयरीडाबर व पालाबार या दुर्गम दोन आदिवासी पाड्यांमधील आदिवासींना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही सध्या कच्चा रस्त्यासाठी झगडावे लागत आहे. केवळ चार किलो मीटरच्या रस्त्याअभावी तब्बल सहा किलो मीटर डोंगर दऱ्यामधून पायपीट करत रापापापूरपर्यंत यावे लागत असते. रस्त्याअभावी आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. उशिरा का होईना प्रशासन जागे झाले असून, आता सदर गावांना दळणवळणाच्या सोयीसाठी चांगला रस्ता कधी तयार होणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips Tulsi: घरात तुळशीचे रोप असेल तर, या गोष्टीची घ्या काळजी

Pune Accident: सुसाट पोर्शे कार, मद्यधुंद चालक अन् भयंकर अपघात! बड्या उद्योगपतीच्या अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडलं; तरुण- तरुणी ठार

Pune News: पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, उरुळी कांचनमध्ये दुकान फोडले; घटना CCTV मध्ये कैद

Beed Accident : चारचाकीची दुचाकी, बैलगाडीला धडक; एकाचा मृत्यू, ३ जण जखमी; बैलांचेही मोडले पाय

Viral Video : आधी महिला भिडल्या मग पुरुषांमध्येही झाली कुटाकुटी; सिटवरून ट्रेनमध्ये तुफान राडा

SCROLL FOR NEXT