Shahada Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Shahada Vidhan Sabha : शहादा- तळोदा मतदार संघात काँग्रेसमध्ये बंड; राजेंद्र गावितांच्या उमेदवारीने नाराजी

Nandurbar News : विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र महाविकास आघाडी व महायुतीमध्ये तीन पक्ष असल्याने जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला होता

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: विधानसभा निवडणुकीत बंडाचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश मतदारसंघात मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरी केली जात आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा मतदारसंघात बंडखोरी झाल्यानंतर आता शहादा तळोदा मतदार संघात काँग्रेसकडून बंडखोरी होत आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याने नाराजी असल्याने अपक्ष उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र महाविकास आघाडी व महायुतीमध्ये तीन पक्ष असल्याने जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला होता. तरी देखील पक्षश्रेष्ठीनी तिढा सोडवत उमेदवारी जाहीर केली आहे. या जागा वाटपावरून अनेक जागांवर मित्र पक्षात नाराजी उफाळून आली. यामुळे बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी अर्ज देखील दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार शहादा- तळोदा मतदार संघात काँग्रेसचे (Congress) जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला आहे. 

राजेंद्र गावितांच्या उमेदवारीने नाराजी 
दरम्यान महाविकास आघाडीत (Shahada) शहादा- तळोदा मतदारसंघ काँग्रेसला सुटला होता, यामुळे काँग्रेसकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळाल्याने सुहास नाईक नाराज झाले होते. यामुळे सुहास नाईक हे अपक्ष उमेदवारी करण्यास तयार आहेत. तीन वाजेपर्यंत पक्षाच्या एबी फॉर्म मिळणार असल्याची अपेक्षा नाईक याना असून एबी फॉर्म न मिळाल्यास करणार अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले आहे. तर काँग्रेस उमेदवार राजेंद्र गावित यांची डोकेदुखी वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT