Dhanshree seethakka saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : तेलंगणाच्या ग्रामविकास मंत्र्यांवर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी; ३५ उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास

Nandurbar News : विधानसभा निवडणुकीतील चुरस आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रचार शिगेला पोहचला असून अनेक ठिकाणी काट्याची टक्कर पाहण्यास मिळत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता काँग्रेसने इतर राज्यातील मंत्र्यांना महाराष्ट्रात उतरवलं आहे. विशेष करून आदिवासी बहुल भाग असलेल्या उत्तर महाराष्ट्राची विशेष जबाबदारी तेलंगणाच्या ग्रामविकास मंत्री धनश्री सिताक्का यांना देण्यात आली असून उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

विधानसभा निवडणुकीतील (Vidhan Sabha Election) चुरस आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रचार शिगेला पोहचला असून अनेक ठिकाणी काट्याची टक्कर पाहण्यास मिळत आहे. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्ष जोरदार तयारीत आहे. त्यानुसार काँगेसने (Congress) देखील आदिवासी असल्यामुळे सिताक्का यांना या आदिवासीबहुल भागाची विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. अर्थात सिधाक्का या उत्तर महाराष्ट्रात पुढील दिवसात प्रचारात उतरणार आहेत. 

३५ उमेदवार निवडून येण्याचा विश्वास 

भाजप या राज्यात फोडाफोडीचे राजकारण करत आहे. तर दुसरीकडे भाजप सरकार हे अदानी आणि अंबानी यांना मोठा करत आहे. मात्र आदिवासी बांधव हे सजग असून ते नेहमी काँग्रेसच्या सोबत आहेत. या विधानसभा निवडणुकीत देखील आदिवासी बांधव हे मोठ्या प्रमाणात काँग्रेस सोबत असून तर महाराष्ट्रातील ३५ च्या ३५ उमेदवार हे निवडून येतील; असा विश्वास तेलंगणाच्या ग्रामविकास मंत्री सिताक्का यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT