Nandurbar Saam tv
महाराष्ट्र

थकबाकीदारांची नावे जाहीर करून घरपट्टी वसुली; भाजपचा विरोध, पालिकेविरुद्ध केली निदर्शने

थकबाकीदारांची नावे जाहीर करून घरपट्टी वसुली; भाजपचा विरोध, पालिके विरुद्ध केली निदर्शने

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार नगरपालिकेच्यावतीने घरपट्टी वसुलीसाठी थकबाकीदारांची नावे फलकात जाहीर केले आहे. असे करून आपमानित करण्याच्या पद्धतीला भारतीय जनता पार्टीचा विरोध असून आज शहरातील जुन्या पालिका चौकात भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. (nandurbar news Recovering the house lease by announcing the names BJP protests against the municipality)

गेल्या दोन वर्षात कोरोना काळात लॉकडाऊनमुळे व्यावसायिक व सामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती पूर्णतः खालावल्याने विविध कर व घरपट्टी भरली गेलेली नाही. या आधीच भारतीय जनता पार्टीच्यावतीने घरपट्टी माफ करावी अशी मागणी केली होती. परंतु नंदुरबार नगरपालिकेने घरपट्टी थकबाकीदारांची नावे फलकात जाहीर करून वसुलीचा तगादा लावला आहे.

नगरपालिकेचा केला धिक्‍कार

कर व घरपट्टी वसुलीसाठी नगरपालिकेच्यावतीने नावे जाहीर करून नागरिकांना अपमानीत करत असल्याने भारतीय जनता पार्टीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. जनतेला छळून अपमानित केल्याचे भारतीय जनता पार्टी खपवून घेणार नाही. याबाबत जनतेमध्ये जनजागृती करणार असून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी त्यांच्या जवळच्या थकबाकीदारांची नावे फलकात जाहीर केलेली नाही. मात्र सामान्य नागरिकांचे नाव फलकात जाहीर केल्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने धिक्कार करत असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT