Nandurbar RTO Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: आरटीओची विक्रमी वसुली; गेल्या वर्षीपेक्षा १ कोटी ६६ लाख रुपयांची वाढ

आरटीओची विक्रमी वसूली; गत वर्षांपेक्षा १ कोटी ६६ लक्ष रुपयांची वाढ

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षात वाहन कर, पर्यावरण कर, नोंदणी शुल्क, परवाना शुल्क, तडजोड शुल्क, इत्यादीच्या माध्यमातून ३९ कोटी ६३ लक्ष रुपये एवढी वसूली करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी एकूण वसूलीमध्ये १ कोटी ६६ लक्ष रु. ची वाढ झाली आहे. (nandurbar Record recovery of RTO An increase of Rs one crore 66 lakhs over last year)

मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कारवाई करण्यासाठी नंदूरबार (Nandurbar) जिल्‍ह्यात या कार्यालयाचे एक वायुवेग पथक कार्यरत आहे. या पथकाव्दारे सन २०२१-२२ या वर्षात ओव्हरलोड वाहतूक, विना हेल्मेट दुचाकी चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, वाहनांमध्ये अनधिकृत बदल करणे, यांत्रिक दृष्टया वाहन सुस्थीतीत नसणे, वाहनाचा विमा नसणे इत्यादी विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या २ हजार ३२५ वाहनांविरुद्ध कारवाई करुन ३ कोटी ३८ लक्ष रु. तडजोड शुल्क व कर वसूली करण्यात आली आहे. सदर महसुल वसूली करण्यासाठी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव तसेच कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक तसेच कार्यालयीन कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

२१७ लायसन्‍स निलंबीत

आर्थीक वर्षात दारु पिवून वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा (Mobile) वापर करणे, धोकादायकरित्या वाहन चालविणे, ओव्हरलोड वाहतूक करणे इत्यादी गुन्‍ह्यांकरीता २१७ वाहनचालकांचे ड्रायव्हींग लायसन्स निलंबीत करण्यात आले आहेत.

सिमा तपासणीत १३ कोटी

महाराष्ट्र- गुजरात (Gujrat) सिमेवर असलेल्या नवापूर (Navapur) सिमा तपासणी नाका येथे या वर्षात ३९ हजार ६२७ वाहनांविरुध्द कारवाई करुन ९ कोटी १८ लक्ष रुपये तसेच अक्कलकुवा सिमा तपासणी नाका येथे १० हजार ३२३ वाहनांकडून ३ कोटी ८८ लक्ष रूपयांची तडजोड शुल्क व कर वसूली करण्यात आली आहे.

वाहनेही वाढले

नंदुरबार जिल्‍ह्यातील एकूण १२ हजार १७९ नवीन वाहनांची नोंद झाली असून त्यात ९ हजार १५८ दुचाकी, १ हजार ९६५ कार/जीप, ६१ रुग्णवाहिका, १ हजार ३८५ ट्रॅक्टर, १४६ ट्रेलर, २२७ मालवाहू वाहने, २८ जेसीबी, ८ टॅक्सी, १ ऑटोरिक्षा व अन्य वाहने यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT