Nandurbar Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: लाल मिरचीला विक्रमी दर..जवळपास झाली ५५ कोटींची उलाढाल

लाल मिरचीला विक्रमी दर..जवळपास झाली ५५ कोटींची उलाढाल

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील कमी पर्जन्यमानामुळे मिरची पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे, तसेच तेलंगणा राज्यातील गुंटुर येथे मिरची उत्पादकांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याने उत्पादनात घट होऊन लाल मिरचीचे दर गगनाला भिडल्याने नंदुरबार (Nandurbar) कृषी उत्पन्न बाजारात देखील कधी न मिळणारे सर्वाधिक विक्रमी दर यंदा हंगामाच्या अंतिम टप्प्यात मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे. (nandurbar news Record rate for red chillies in bajar samiti urned around 55 crores)

गुजरात (Gujrat), मध्यप्रदेश राज्यांच्या सीमेवरील महाराष्ट्रातील (Maharashtra) नंदुरबार जिल्हा मिरची उत्पादन व खरेदी- विक्रीसाठी आगार म्हणून ओळखला जातो. चालू हंगामात जिल्ह्यात जवळपास साडेतीन हजार हेक्टरवर मिरची पिकाची (Red Pepper) लागवड करण्यात आली होती. मिरची पिकावरील रोग किडीचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट, लागवड खर्चात वाढ, खतांच्या किंमतीत वाढ अशा अनेक कारणांमुळे मिरची पीक परवडत नसल्याने अनेक मिरची उत्पादक शेतकरी (Farmer) कापूस व इतर पिकांकडे वळले असल्याचे चित्र आहे.

आठ हजारपर्यंत दर

हंगामाच्या सुरवातीला उत्पादन जास्त असताना पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल खरेदी सुरू होती. आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना मागणी वाढल्याने दर चार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीने (Nandurbar Market Committee) आतापर्यंत १ लाख ७५ हजार क्विंटल खरेदीचा टप्पा पार केला असून हंगामाच्या अखेरपर्यंत दोन लाख क्विंटल पेक्षा अधिक आवक येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जवळपास ५५ कोटींची उलाढाल मिरची खरेदी विक्रीतून झाली आहे.

खर्चात परवडेना

खुल्या बाजारपेठेतील मिरची पावडरचे दर पाहता मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा दर अत्यंत कमी आहे. कमी पर्जन्यमान व अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनात घट झाली असली तरी खतांच्या किंमती व मजुरी लागवडी खर्चात वाढ झाली आहे. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात व्यापार्‍यांकडून शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्याने काहीसा दिलासा असला तरी भविष्यात शेतकऱ्यांना आणखी चांगले दर द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अन्‍य राज्‍यातील व्‍यापाऱ्यांना परवानगी हवी

मिरची खरेदीच्या दरात आणखीन वाढ झाली असती. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीत गुजरात आणि मध्यप्रदेश किंवा इतर राज्यातील मिरची खरेदी व्यापाऱ्यांना लिलावात परवानगी दिली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांची गळचेपी करून ठराविक व्यापारी व बाजार समितीद्वारे मनमानी सुरू असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT