देवीच्या दारात भक्तांचा राडा; महिलेला धक्का लागल्याच्या कारणावरुन यात्रेत तलवारी, गुप्तीसह हाणामारी

किरकोळ वाटणाऱ्या या हाणामारीचे रुपांतर सशस्त्र हल्ल्यात झाले. यामध्ये तलवारी, गुप्ती, कोयत्याने एकमेकांवर हल्ले करण्यात आले.
देवीच्या दारात भक्तांचा राडा; महिलेला धक्का लागल्याच्या कारणावरुन यात्रेत तलवारी, गुप्तीसह हाणामारी
देवीच्या दारात भक्तांचा राडा; महिलेला धक्का लागल्याच्या कारणावरुन यात्रेत तलवारी, गुप्तीसह हाणामारीकैलास चौधरी
Published On

कैलास चौधरी -

तुळजापूर : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील धार्मिक स्थळ असलेल्या तुळजापूर (Tuljapur) तालुक्यातील चिवरी येथे जोरदार राडा झाला आहे. या राड्यात पंधराजणं जखमी झाले आहेत. चिवारी येथे महालक्ष्मीचे मंदिर (Mahalakshmi Temple) असून या ठिकाणी दरवर्षी यात्रा भरते त्याअनुषंगाने मागील दोन दिवसांपासून येथील उत्सव सुरू होता. मात्र काल रात्री यात्रेत महिलेला धक्का लागल्याच्या कारणावरून पारधी समाजातील दोन गटात तुफान हाणामारी झाली यात शस्त्रांचा वापर करण्यात आला या सशस्त्र हाणामारीत 15 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

महालक्ष्मीच्या यात्रेसाठी काल पारधी समाजातील अनेक जण जमले होते. सायंकाळी विशेष पुजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर बळी देण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर जेवणासाठी सर्वजण एकत्र बसल्यानंतर एका विवाहितेला दुसऱ्याचा धक्का लागला आणि धक्का मारल्याच्या कारणावरून विवाहितेच्या नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीला बेदम मारहाण केली.

देवीच्या दारात भक्तांचा राडा; महिलेला धक्का लागल्याच्या कारणावरुन यात्रेत तलवारी, गुप्तीसह हाणामारी
भाजपच्या महिला आमदाराला 'कमळीबाई' म्हटल्याने भावाची मनसे कार्यकर्त्याला जबर मारहाण; Video व्हायरल

यावरून त्या व्यक्तीच्या बाजूनेही काहीजण मारामारीसाठी पुढे आले. अगोदर किरकोळ वाटणाऱ्या या हाणामारीचे रुपांतर सशस्त्र हल्ल्यात झाले. यामध्ये तलवारी, जांबिये, गुप्ती, कोयत्याने एकमेकांवर हल्ले करण्यात आल्याचे समजते. यापैकी पाच जणांना जिल्हा रुग्णालयात (District Hospital) दाखल करण्यात आले आहे.तर उर्वरित राडा करणारे घटनास्थळावरून पसार झाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com