भाजपच्या महिला आमदाराला 'कमळीबाई' म्हटल्याने भावाची मनसे कार्यकर्त्याला जबर मारहाण; Video व्हायरल

मनसे कार्यकर्त्याला (MNS Activist) रॉड ने मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) वायरल झाला आहे.
भाजपच्या महिला आमदाराला 'कमळीबाई' म्हटल्याने भावाची मनसे कार्यकर्त्याला जबर मारहाण; Video व्हायरल
भाजपच्या महिला आमदाराला 'कमळीबाई' म्हटल्याने भावाची मनसे कार्यकर्त्याला जबर मारहाण; Video व्हायरलSaam Tv
Published On

बुलडाणा : . भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या चुलत भावाने मनसे कार्यकर्त्याला (MNS Activist) रॉडने जबर मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) वायरल झाल्याने चिखली शहरात एकच खळबळ उडाली आहे.

भाजपा आमदार श्वेता महाले (BJP MLA Shweta Mahale) यांच्या विषयी मनसे कार्यकर्ता विजय खरपास याने सोशल मीडियावर कमळीबाई असा उल्लेख केल्याने भाजपा आमदार श्वेता महाले यांचे भाऊ शिवराज महाले पाटील यांनी एका ठिकाणी बोलावून विजय खरपास ला बेदम मारहाण केल्याच्या घटनेनं चिखली शहरात चर्चेला उधाण आलं आहे.

भाजपच्या महिला आमदाराला 'कमळीबाई' म्हटल्याने भावाची मनसे कार्यकर्त्याला जबर मारहाण; Video व्हायरल
धक्कादायक : कोल्हापुरात 21 वर्षीय मुलीने बॅटने मारहाण करत केली वडिलांची हत्या

या मारहाणीचा CCTV व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला , पोलिसांनी शिवराज पाटील व त्यांचे तीन ते चार सहकाऱ्यांविरोधात भादवी 307 नुसार चिखली पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले असून जखमी विजय खरपासला औरंगाबाद (Aurangabad) येथील रुग्णालयात उपचासाठी भरती करण्यात आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com