Shahada Police Saam tv
महाराष्ट्र

पुष्पा चित्रपटाची भन्नाट शक्कल..शेणखत भरलेल्या ट्रॅक्टरमधून मद्याची वाहतूक

पुष्पा चित्रपटाची भन्नाट शक्कल..शेणखत भरलेल्या ट्रॅक्टरमधून मद्याची वाहतूक

दिनू गावित

नंदुरबार : 'पुष्पा' चित्रपटात दूधाआडून रक्तचंदनाची तस्करी केली जात असल्‍याचे दाखविले आहे. शहाद्यात मात्र शेणखताआडून विदेशी मद्याची वाहतूक अक्कलकुवामार्गे थेट गुजरात राज्यात केली जात असल्याचे पोलीस (Police) तपासात समोर आले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने याचा छडा लावल्याने कौतुक केले जात आहे. (nandurbar news Pushpa movie seen transportation of liquor from a tractor full of dung)

शहादा (Shahada) तालुक्यातील असलोदकडून पिंपर्डे गावाजवळून शेणखत वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टर ट्रालीत सुमारे नऊ लाख रुपयांचे विदेशी मद्य आढळून आले. एलसीबीच्या (LCB) पथकाने सदरच्या मद्यासह ट्रॅक्टर असा सुमारे १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मद्य वाहण्यासाठी वापरलेल्या या भन्नाट शक्कलची मात्र चर्चा सुरू आहे.

शेणखत कोरून पाहिले तर..

पोलीस (Shahada Police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील मंदाणा येथे मध्यरात्री एक लाल रंगाच्‍या ट्रॅक्टरमध्ये शेणखत भरलेले असून त्याखाली देशी-विदेशी दारुचे खोके ठेवून अवैध चोरटी वाहतुक करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यावरुन पोलिसांनी सापळा रचत सदर ट्रॅक्टरची तपासणी केली असता चालकाने शेणखत असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी ट्रॅक्टरमधील शेणखत बाजूला केले असता तब्बल नऊ लाखांचा देशी-विदेशी मद्यसाठा आढळून आला. याबाबत चालकाला ताब्यात घेऊन ट्रॅक्टरसह एकून सोळा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT