Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

राज्यपालांच्‍या दत्तक गावातही निकृष्ट काम; भगदरीचा पूल अखेर कोसळला

राज्यपालांच्‍या दत्तक गावातही निकृष्ट काम; भगदरीचा पूल अखेर कोसळला

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : सातपुड्याच्‍या (Satpuda) भागातील भगदरीचा महुफळी येथील फुलहार नदीवरील पूल आज अचानक कोसळला. विशेष म्‍हणजे तत्‍कालीन राज्‍यपाल विद्यासागर राव यांनी दत्तक घेतलेल्या गावातील ही घटना आहे. निकृष्‍ट काम झाल्‍याने ही घटना (Nandurbar) घडल्‍याचे सांगितले जात आहे. (Nandurbar News Bhagdari Bridge collapsed)

नर्मदा काठावरील आठ ते दहा गावांना जोडणारा अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील भगदरी येथील नदीवरील फरशीपूल पावसाळ्याच्या (Rain) सुरुवातीस काही भाग वाहून गेला होता. सदर पूल आता पूर्णपणे कोसळला आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. अककलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या व डोंगराळ भागातील भगदरीचा महुफळी येथील फुलहार नदीवरील पूल तत्कालीन राज्यपाल तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दत्तक घेतलेल्या गावाचा आहे. अत्यंत कमी उंचीचा आणि निकृष्ट दर्जाचा बांधल्याने सदर पुलाची हे अवस्था झाली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

सहा गाव पाड्यांची झाली गैरसोय

सध्या पाऊस बंद आहे. नदीला देखील फारसे पाणी नाही. असे असताना हा पूल कोसळला. यामुळे नर्मदा काठावरील मांडवा, कंजाला डेब्रामाळ, पलासखोब्रा, वेलखेडी मोजापाडा, उर्मिलापाडा या गावासह पाड्यांवरील नागरिकांना व वाहनधारकांना या पुलाअभावी गैरसोय झाली आहे. सातपुडा पर्वतरांगांमधून पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर येत असल्याने या ठिकाणी जास्त उंचीचा व चांगल्या दर्जाचा पूल बांधणे अपेक्षित असतानाही कमी उंचीच्या निकृष्ट दर्जाचे काम केल्याने आज नागरिकांवर ही वेळ आली आहे. याकडे आता प्रशासन कधी लक्ष देत हे बघणे उत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT