सागर निकवाडे
नंदुरबार : शहादा शहरात रात्री सुमारे दोन तास जोरदार पाऊस कोसळल्याने शहर जलमय झाले आहे. विशेष म्हणजे शहादा शहरातून जाणाऱ्या पाटचारीचे पाणी यंदाही शहादा न्यायालयाच्या आवारात शिरले आहे. यामुळे संपूर्ण न्यायालय परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे. सर्व न्यायालय व न्यायाधीशांच्या निवासस्थानामध्ये गुडघाभर पाणी शिरल्याने न्यायालयाचे कामकाज ठप्प झाले आहे.
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा न्यायालयाच्या समोर डोंगरगाव तलावातून आलेली पाटचारी वाहते. मोठा पाऊस आला तर या पाटचारीचे पाणी दरवर्षी न्यायालयात शिरते आणि कामकाज ठप्प होते. यंदाही या पाटचारिचे पाणी मोठ्या प्रमाणात न्यायलय परिसरात शिरल्याने परिसराला तलावाचे स्वरुप आले आहे. या परिसरात सुमारे गुडघाभर पाणी साचले आहे. (Heavy Rain) न्यायालयाची जुनी ईमारत खोलगट भागात असल्याने या न्यायालयाचे कामकाज चालत असलेल्या सर्व ईमारतींमध्ये मोठ्या प्रमाणत पाणी साचले आहे. पाटचारी शिवाय पाण्याचा निचरा नसल्यामुळे पाणी न्यायालयाच्या आवारात साचून आहे.
इमारतींमध्ये गुडघाभर पाणी
पाण्याचा योग्य निचरा नसल्याने तीन ते चार दिवस हे पाणी ईमारत व आवारात साचून राहते. परिणामी तोपर्यंत न्यायालयीन कामकाज ठप्प राहते अथवा तश्याच परिस्थितीत कामकाज चालवणे भाग पडते. कसेतरी पाण्याचा निचरा केला, तरी न्यायालय परिसर व सर्व इमारतीमध्ये कित्येक दिवस मोठ्या प्रमाणात चिखल व घाण, कचरा साचलेला राहत असल्याने आरोग्यही धोक्यात येते. सुदैवाने आज न्यालयाला मोहरमची सुटी असल्याने न्यालयाचे सुनावणीचे काम बंद होते. मात्र दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. न्यायाधिशांच्या दोन मजली ईमारतींच्या तळ मजल्यात गुडघाभर तर सिंगल मजली जुन्या इमारतीमध्ये पाणी शिरल्याने न्यायाधीशांच्या कुटुंबीयांना समस्येचा सामना करावा लागत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.