Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Nandurbar News : नंदुरबार शहरात दोन गटात दगडफेकीची घटना घडली होती. त्यामुळे माळीवाडा परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार शहरात काल अफवेमुळे दगडफेक होऊन दंगल उफाळून आली होती. नंदुरबार शहरात झालेल्या दंगलीनंतर तणावपूर्ण शांतता आहे. दंगल करणाऱ्या आरोपींवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दगडफेक करणाऱ्या चाळीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

नंदुरबार (Nandurbar News) शहरात दोन गटात दगडफेकीची घटना घडली होती. त्यामुळे माळीवाडा परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ईद- ए- मिलादच्या जल्लोष मिरवणूक दरम्यान हा सर्व प्रकार घडला होता. त्यामुळे परिसरात तणाव पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, यासाठी जिल्हा पोलीस (Police) दलासोबतच राज्य राखीव दलातील दाखल झाले आहेत. माळीवाडा, इलाई चौक परिसरामध्ये आज देखील तणावपूर्ण शांतता पसरली आहे.  

शहरात घडलेल्या दंगलीच्या प्रकारानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून दगडफेक करण्यात आरोपींना पकडण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात आतापर्यंत ४० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दंगल करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत पोलिस दलाकडून देण्यात आलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रस्तावित कचरा डेपो विरोधात सावळा, सुंदरखेड, माळविहीर ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा..

2 ते 4 ऑक्टोबरच्या सरकारी सुट्ट्या रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

सणासुदीच्या तोंडावर साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, साठेबाजांचे दाबे दणाणले; काढला नवा आदेश

Vastu Tips Inauspicious Signs : हातातून ‘या’ 5 वस्तू खाली पडल्या तर मानलं जातं अशुभ; कुटुंबावर येऊ शकतं संकट?

BJP Maharashtra : भाजपचा मेगाप्लान! महाराष्ट्रात नव्या टीमची घोषणा, विरोधकांची धार बोथट करणार

SCROLL FOR NEXT