Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Raigad News : महावितरण कंपनीचे कर्मचारी सदाशिव गावित यांनी कार्यालयीन आदेशाप्रमाणे विज बिल थकीत असल्याने महाड तालुक्यातील बिरवाडी शहरातील सुनिल देशमुख यांच्या दुकान गाळ्याचा विज पुरवठा खंडीत केला
Mahad News
Mahad NewsSaam tv
Published On

सचिन कदम 
रायगड
: दर महिन्याला महावितरणकडून देण्यात येणारे बिल थकविले होते. यामुळे थकित विज बिल प्रकरणी विज पुरवठा खंडीत करण्यासाठी आलेल्या विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार महाड तालुक्यातील बिरवाडी शहरात घडला आहे. या प्रकरणी महाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महावितरण (Mahavitaran) कंपनीचे कर्मचारी सदाशिव गावित यांनी कार्यालयीन आदेशाप्रमाणे विज बिल थकीत असल्याने (Mahad News) महाड तालुक्यातील बिरवाडी शहरातील सुनिल देशमुख यांच्या दुकान गाळ्याचा विज पुरवठा खंडीत केला. वीज पुरवठा खंडित केल्याचा राग येऊन योगेश झांजे यांनी विज वितरण कंपनीचे कर्मचारी गावित हे मोटर सायकलवरून जात असताना त्यांना आडवून थांबविले. यानंतर त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांच्या मोटर सायकलची चावी काढून घेतली.  

Mahad News
Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

पोलिसात गुन्हा दाखल 

महावितरणच्या कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून मारहाण करीत शिवीगाळ केल्याप्रकरणी गावित यांनी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शासकिय सेवा बजावत असताना सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकाणी आरोपी योगेश झांजे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिस अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com