Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: गुन्‍हा दाखल न होण्यासाठी लाच; पोलिस शिपायाला रंगेहाथ पकडले

गुन्‍हा दाखल न होण्यासाठी लाच; पोलिस शिपायाला रंगेहाथ पकडले

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी विसरवाडी (ता. नवापूर) पोलिस ठाण्याच्या पोलिस शिपायाला आठ हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना रंगेहाथ पकडले. (Letest Marathi News)

तक्रारदार व इतर यांच्यात झालेल्या मारहाण व वादाच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये; म्हणून पोलिस शिपाई दारासिंग जोरसिंग पावरा याने तक्रारदाराकडून १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती आठ हजार रुपये देण्याचे ठरले. (ACB) लाचलुचपत विभागाने सापळा रचून पावराला आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

पोलिस शिपाई पावरा याच्याविरुद्ध विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. चलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक माधवी वाघ, हवालदार विलास पाटील, पोलिस नाईक अमोल मराठे, ज्योती पाटील, मनोज अहिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Care : तासनतास कमोडवर बसून मोबाईल स्क्रोल केल्याने हार्ट अटॅक येतो? वेळीच व्हा सावध, नाहीतर....

डेलीवेअरसाठी स्टायलिश आणि कम्फर्टेबल मंगळसूत्र; पाहा 5 लेटेस्ट डिझाईन्स!

Maharashtra News Live Update: ठाकरे शिवसेनेला कणकवलीत मंत्री नितेश राणेंचा धक्का

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी महापौर आणि फायरब्रँड नेत्याचं नगरसेवकपद रद्द?

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

SCROLL FOR NEXT