Nandurbar Palika 
महाराष्ट्र

नंदुरबार पालिकेच्‍या नगरसेविकेसह माजी उपनगराध्यक्ष पतीवर गुन्हा; मालमत्‍तेची परस्‍पर विक्री

नंदुरबार पालिकेच्‍या नगरसेविकेसह माजी उपनगराध्यक्ष पतीवर गुन्हा; मालमत्‍तेची परस्‍पर विक्री

दिनू गावित

नंदुरबार : शहरातील युनियन बॅकेकडे गहाण असलेली मालमत्ता तत्कालीन सहनिंबधक आणि तलाठ्यांच्या संगनमताने परस्पर विक्री केल्या प्रकरणी नंदुरबार नगरपालीकेच्या विद्यमान नगरसेविकेसह माजी उपनगराध्यक्षांच्‍या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तत्कालीन सर्व सहनिंबधक आणि तत्कालीन सर्व तलाठी यांना देखील सह आरोपी करण्यात आले आहे. (nandurbar-news-palika-former-Deputy-Mayor's-husband-and-corporator-police-fir-Mutual-sale-of-palika-property)

तारण मालमत्‍तेवर बोजा

युनियन बँकेकडे नगरपालिकेने कर्जापोटी ही सर्व मालमत्ता जवळपास ४ कोटी ५९ लाखांना तारण होती. तिच्यावर बॅकेचा बोजा असतांना देखील तिची परस्पर विक्री झाली. विशेष म्हणजे तारण असतांना सहनिंबधक कार्यालयाने तिची खरेदी विक्री केलीच कशी आणि तलाठींनी सातबाऱ्यावरचा बोजा कमी केला कसा? हा देखील प्रश्न असुन यात पुर्ण साखळीच कार्यरत होती.

शहर पोलिसात गुन्‍हा

युनियन बॅकेचे व्यवस्थापक भटेसिंग ठाकुर यांच्या तक्रारीवरुन नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नंदुरबार पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याने आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत अधिक तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:आयुष कोमकर खूनप्रकरणी २ जणांना अटक तर १३ जणांवर गुन्हा

Pune Metro : पुणे मेट्रो सुसाट! २४ तासांत तब्बल ६ लाख जणांचा प्रवास, गणेशोत्सवात मेट्रोची कोट्यवधींची कमाई

Coconut Chikki Recipe :घरीच १० मिनिटांत बनवा खोबऱ्याची चिक्की, मिळेल मार्केटसारखी चव

Ankita Walawalkar : सलमान खानच्या 'Bigg Boss 19' मध्ये अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: सप्टेंबरचा पहिला आठवडा उलटून गेला, लाडक्या बहिणींना ऑगस्टचे ₹१५०० कधी येणार?

SCROLL FOR NEXT