Nandurbar Rain Alert Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Rain Alert : नंदुरबार जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; सकाळपासून मुसळधार पाऊस, दुकानांमध्ये शिरले पाणी

Nandurbar News : खानदेशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात देखील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. यामुळे प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार आज सकाळपासूनच जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पुढील २४ तासात आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस सुरु आहे. शिवाय पुढील तीन- चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यानुसार खानदेशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात देखील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. यामुळे प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे.   

मुसळधार पावसाने दुकानात शिरले पाणी 

हवामान खात्याने नंदुरबारसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील २४ तासांत अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तर शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. परशुराम चौकात तर गुडघाभर पाणी जमा झाल्यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

जळगाव जिल्ह्यातही रात्रीपासून पाऊस 

जळगाव जिल्ह्यात देखील ७ सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर जिल्ह्यात ३ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा पावसाला सुरवात झाली आहे. तर रात्रीपासून जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे. आज सकाळी देखील ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT