Marathwada Heavy Rain : अति पावसाचा फटका; मराठवाड्यात १५ लाख ७८ हजार शेतकऱ्यांचे नुकसान, नांदेडमध्ये सर्वाधिक नुकसान

Sambhajinagar News : नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. लातूर दुसऱ्या क्रमांकावर, हिंगोली तिसऱ्या तर धाराशिव नुकसानीत चौथ्या क्रमांकावर आहे. यामुळे या चारही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
Marathwada Heavy Rain
Marathwada Heavy RainSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. प्रामुख्याने नांदेड व हिंगोली जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला असून अतिपावसामुळे शेतातील प्रचंड नुकसान झाले आहे. अजूनही शेतांमध्ये पाणी साचले असल्याने मराठवाड्यातील साधारण ४ हजार गावातील शेतशिवतील पिकांचा चिखल झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. 

मराठवाड्यात मागील ३ महिन्यांत अतिपावसामुळे विभागातील ३ हजार ९२९ गावांतील खरीप पिकांचा चिखल झाला आहे. यामध्ये साधारण १५ लाख ७८ हजार ३३ शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या हातून गेल्या आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. लातूर दुसऱ्या क्रमांकावर, हिंगोली तिसऱ्या तर धाराशिव नुकसानीत चौथ्या क्रमांकावर आहे. यामुळे या चारही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. 

Marathwada Heavy Rain
Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; जालनासह बुलढाणा आणि बीड जिल्ह्यातील खातेदारांना नोटीसा

पंचनामे करण्यास होतोय विलंब 

दरम्यान पावसामुळे नुकसान झाले असताना नुकसानीच्या पंचनाम्यांना अद्याप गती मिळालेली नाही. आतापर्यंत ५ लाख ६२ हजार ७२७ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर ७ लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे अजून बाकी आहेत. १२ लाख ४६ हजार २४९ हेक्टरवरील खरीप पिकांची अतिवृष्टीमुळे नासाडी झाल्याचे विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात नमूद आहे. 

Marathwada Heavy Rain
Akkalkuwa News : मरण यातना संपेना; महिलेला सर्पदंश, उपचारासाठी रात्रीच्या अंधारात बांबूच्या झोळीतून जीवघेणा प्रवास

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान 

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील २८९५ मालमत्तांचे नुकसान झाले आहे. यात ६ मालमत्ता पुरात वाहून गेल्या असून ४१५ मालमत्तांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय २८९५ मालमत्तांची अशंतः पडझड झाली आहे. तर ७२ झोपड्या पुरात वाहून गेल्या. २५६ जनावरांचे गोठेही पडले. तर १ हजार ४९ सर्व प्रकारांतील जनावरांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय जीवितहानी झाली असून ५० व्यक्ती पुरात वाहून व वीज पडून दगावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com