Akkalkuwa News Saam tv
महाराष्ट्र

Akkalkuwa News : गावात जायला आजही रस्ता नाही; आदिवासी बांधवाची रोजची पायपीट थांबेना

Nandurbar News : देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण होण्यात येत आहे. तरी देखील सातपुड्याच्या दुर्गम भागात आजही रस्ते नसल्यामुळे इथल्या नागरिकांना मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे पूर्ण होण्यात येत आहे. परंतु सातपुड्याच्या दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या अजूनही सुटता सुटेना. वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागातील केलखाडी वस्तीतील नागरिकांना आजही रस्ता नसल्याने पायपीट करावी लागत आहे. 

देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण होण्यात येत आहे. तरी देखील नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुड्याच्या दुर्गम भागात आजही रस्ते नसल्यामुळे इथल्या नागरिकांना मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील गंगापूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या केलखाडी पाड्याला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे इथल्या नागरिकांना आपल्या घरातून दळणवळणासाठी, आरोग्याच्या समस्यांसाठी आणि इतर महत्त्वाच्या काम करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. 

रोजची पायपीट थांबेना 

केलखाडी पाड्यात जवळपास ८०० लोक वस्ती आहे. या वस्तीच्या नागरिकांकडून प्रशासनाला वारंवार सांगून देखील रस्ता तयार झालेला नाही आहे. प्रामुख्याने येथील नागरिकांना आरोग्याची समस्या उद्भवल्यास रुग्णाला झोळी करून खांद्यावर टाकून पायपीट करत रुग्णालयापर्यंत पोहचावे लागत असते. याशिवाय रोजच्या दैनंदिन कामासाठी पायीच जावे लागत असते. 

पक्का रस्ता करण्याची मागणी 

या सर्व प्रकारामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. परंतु आम्हाला स्वातंत्र्य कधी मिळणार आणि देशातल्या सुविधा कधी मिळणार? असा प्रश्न इथल्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शासनाने आणि प्रशासनाने यांची दखल घेऊन तातडीने केलखाडी पाड्याला जोडणारा रस्ता तयार करण्यात यावा; अशीच मागणी इथल्या नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT