Navapur News
Navapur News Saam tv
महाराष्ट्र

Navapur News: घराच्‍या तिसऱ्या मजल्यावर आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर (Navapur) शहरातील लाईट बाजार परिसरात दुपारी साडेबारा वाजता सुमारास घराच्‍या तिसऱ्या मजल्यावर अचानक आग (Fire) लागली. आगीने तात्काळ रुद्ररूप धारण केले. या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र संसारोपयोगी साहित्‍य जळून खाक झाले आहे. (Breaking Marathi News)

नवापूरातील लाईट बाजार (Nandurbar News) परिसरातील राजूभाई नागरमल अग्रवाल यांच्या निवासस्थानी आग लागली. आग विझवण्यासाठी आजूबाजूच्या व्यापारी व नागरिक मदतीला धावून आले. व्यापाऱ्यांनी तात्काळ नवापूर पोलीस व नगरपालिकेच्या अग्निशमक दलाला (Fire Brigade) पाचारण केले. अग्निशामक दल तात्काळ दाखल झाले असून आग विझवण्याचे काम करण्यात आले. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून किरकोळ नुकसान झाले आहे.

घराला लागलेल्‍या आगीचे कारण अजून समजू शकलेले नाही. अर्धा पाऊण तासानंतर आग नियंत्रणात आली. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली. भर बाजारात आग लागल्याने मोठी गर्दी झाली आहे. या ठिकाणी काही काळ वाहतुकीचे कोंडी निर्माण झाली. आगीत किती नुकसान झाले अजून तरी स्पष्ट झाले नाही. परंतु तिसऱ्या मजल्यावरील घर सामान जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महसूल विभागाने आगीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अग्रवाल कुटुंबांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: भाजपचे पुण्यातील उमेदवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे घेणार सभा

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

Marathi Manus : महाराष्ट्रात मराठी माणसाला अशी वागणूक, म्हणे 'नॉट वेलकम'! मराठी तरूणाच्या मनाला काय वाटलं? वाचा

Yashwant Killedar MNS | मनसे आणि ठाकरे गट शिवाजी पार्क कुणाला?

SCROLL FOR NEXT