Dhule News: ढगाळ वातावरणामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांतर्फे फवारणी

ढगाळ वातावरणामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांतर्फे फवारणी
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्‍याने शेती पिकांवर परिणाम उद्‌भवणार आहे. प्रामुख्‍याने (Wheat) गहू, हरभरा पिकांवर अधिक रोग पडण्याची शक्‍यता आहे. यामुळे पिकांवर रोगराई होवू नये याकरीता शेतकरी वर्ग आता फवारणी करत आहे. (Maharashtra News)

Dhule News
Accident News: दुचाकीला ट्रकची मागून धडक; एकुलत्‍या एक मुलाचा जागीच मृत्‍यू, अन्‍य एक गंभीर जखमी

गेल्या तीन दिवसांपासून धुळे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) चिंता वाढली आहे. या ढगाळ वातावरणामुळे गहू व हरभरा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असल्याने शेतकऱ्यांतर्फे (Dhule News) गहू व हरभरा या पिकांवर औषधांची फवारणी करून वातावरण बदलाचा फटका पिकांना बसू नये याची काळजी घेतली जात आहे.

उत्‍पन्‍नात घट येण्याची भीती

जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे गहू व हरभरा या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पन्नात घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढगाळ वातावरणाचा परिणाम पिकांवर होऊ नये; यासाठी शेतकऱ्यांतर्फे औषधांची फवारणी करून पीक वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com