Nandurbar Temperature Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Temperature : उष्णतेची लाट.. नंदुरबार जिल्ह्याचे तापमान पोहोचलं ४२ अंशावर

Nandurbar News : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वातावरणात बदल होऊन राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीट देखील झाली.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : मागील आठवड्यात वातावरणात बदल होऊन राज्यात अवकाळी पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. यानंतर आज अचानक (Heat Wave) उष्णतेची लाट आल्याचा अनुभव येत असून (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. (Live Marathi News)

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वातावरणात बदल होऊन राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीट देखील झाली. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ४२ अंशापर्यंत गेलेल्या (Temperature) तापमान अवकाळी पाऊस झाल्यानंतर खाली घसरले होते. तसेच वातावरणात गारवा जाणवत होता. मात्र नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

६१ उष्माघात केंद्र 

नंदुरबार जिल्ह्याचे तापमान ४२ अंश सेल्सिअस वर पोहोचल्यानंतर विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन आरोग्य विभागाचा माध्यमातून करण्यात येत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा फटका बसण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने ६१ उष्माघात उपचार केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matar Usal Recipe : थंडीच्या दिवसांत बनवा गरमागरम 'मटार उसळ', एकदा खाल तर खातच राहाल

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

SCROLL FOR NEXT