MSRTC Electric Bus Saam tv
महाराष्ट्र

Electric Bus: आता नंदूरबार जिल्ह्यातही धावणार इलेक्ट्रीक बस

आता नंदूरबार जिल्ह्यातही धावणार इलेक्ट्रीक बस

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : राज्य परिवहन महामंडळाने अनेक भागात इलेक्ट्रिक बस सुरू केली आहे. या इलेक्ट्रिक बसमुळे (Electric Bus) इंधन आणि प्रदूषणमुक्ती होणार आहे. यासाठी इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता (Nandurbar) सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये देखील इलेक्ट्रिक बस धावणार आहे. (Latest Marathi News)

राज्‍य परिवहन महामंडळाकडून टप्‍प्‍याटप्‍प्‍याने इलेक्‍ट्रीक बस सुरू केल्‍या जात आहे. महामंडळाच्‍या प्रत्‍येक विभागात या बस सुरू होत आहे. या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील चारही आगारांना प्रत्येकी तीन इलेक्ट्रिक बस दिली जाणार आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मोठ्या बसेस घाटात चालत नाही. त्यामुळे मिनी इलेक्ट्रिक बस दिली जाणार आहे.

इलेक्ट्रिक बस मुळे इंधन प्रदूषणमुक्त त्यासोबत वेळेची देखील मोठी बचत होणार आहे. तर परिवहन महामंडळाच्या (MSRTC) तिजोरीत देखील पैशांची वाढ होणार आहे. या इलेक्ट्रिक बससाठीचा चार्जिंग स्टेशन लवकरच तयार करण्यात येणार आहेत. आधी चार्जिंग स्टेशन तयार करण्यात येणार आहेत. त्यानंतर इलेक्ट्रिक बस देखील येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Dwarka: द्वारका चौकाची कोंडी फुटणार; २१४ कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

धुक्यामुळे रस्ता दिसला नाही, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Election: प्रशासनाचा भोंगळ कारभार; मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदी नियुक्ती

महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, पुण्यात भाजप ठाम शिंदेसेनेला घाम

Maharashtra Live News Update: ठाण्यात प्रमोद गोगावले यांच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर.. परिसरात घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT