Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : सावधान! तुमचा मोबाइल दुसऱ्याला कॉल करण्यासाठी देऊ नका, अन्यथा जे दुकानदारासोबत घडलं ते तुमच्यासोबत घडेल

Nandurbar News : सायबर गुन्हेगारीतील फसवणूक करण्याचा नवीन प्रकार समोर आला आहे. यामुळे आता कोणाला मदत करणे देखील महागात पडू शकते; याची प्रचिती खांडबारा येथे घडलेल्या घटनेने आली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: एखादी अनोळखी व्यक्ती कॉल करण्यासाठी मोबाईल मागत असेल तर सावधान. कारण फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईलचा गैरवापर करून लुबाडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच घटना नवापूर तालुक्यात घडली असून कॉल करण्यासाठी एकाला दुकानदाराने मोबाईल फोन देणे चांगलेच महागात पडले आहे. या प्रकारच्या संबंधित दुकानदाराची १६ हजार रुपयात फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. 

नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील खांडबारा गावामध्ये हा प्रकार घडला आहे. अर्थात सायबर गुन्हेगारीतील फसवणूक करण्याचा नवीन प्रकार समोर आला आहे. यामुळे आता कोणाला मदत करणे देखील महागात पडू शकते; याची प्रचिती खांडबारा येथे घडलेल्या घटनेने आली आहे. एका अनोळखी व्यक्तीने केलेल्या एका कॉलमुळे दुकानदाराच्या बँक खात्यातून तब्बल १६ हजार रुपये लंपास झाले आहेत.

अर्जंट फोन करण्याचे सांगून घेतला मोबाईल 

नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील मोबाइल दुकानावर एक अनोळखी तरुण आला. याठिकाणी त्याने दुकानदाराला अर्जंट फोन करायचा आहे असे सांगत मोबाईल मागितला. दुकानदाराने माणुसकीच्या नात्याने त्याला आपला मोबाइल फोन दिला. त्यानुसार संबंधिताने नंबर डायल केला. परंतु फोनवर आवाज येत नसल्याचे सांगून त्याने मोबाईल दुकानदाराला परत देऊन सदर तरुण लगेच निघून गेला. 

काही क्षणात खात्यातून रक्कम गायब 

दरम्यान काही क्षणातच दुकानदाराच्या मोबाइलवर सुरवातीला ६ हजार आणि नंतर १० हजार रुपये खात्यातून काढल्याचे मेसेज आले. हे मॅसेज आल्याने दुकानदार गोंधळून गेला. तर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दुकानदाराने तात्काळ नंदुरबार सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. मात्र तोपर्यंत फसवणूक करणारा तरुण पसार झाला होता. या प्रकरणी सायबर सेलने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तुळजाभवानी मंदीराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठा गोंधळ

Chilli Burn Relief: हिरवी मिरची चिरल्यावर हात जळतात? 'हे' घरगुती सोपे उपाय करून आराम मिळवा

Vaibhav Suryavanshi Century : १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची कमाल; ऑस्ट्रेलियात तडाखेबंद शतक ठोकून रचला इतिहास

Ayurveda Health Care: शिळं अन्न खाताय? ३ तासातच होतील आरोग्यावर परिणाम; आयुर्वेदाचा इशारा

Navratri Fasting Tips: नवरात्रीचा उपवास सोडताना काय खावे अन् काय खाऊ नये?

SCROLL FOR NEXT