Navapur Police Saam tv
महाराष्ट्र

Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

Nandurbar News : बंदी असताना देखील दारूची तस्करी छुप्या पद्धतीने केली जात असते. अशाच प्रकारे भाजीपाल्याच्या गाडीतून चोरून विदेशी दारूची तस्करी केली जात असताना नवापूर पोलिसांनी कारवाई केली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: महाराष्ट्र- गुजरात सीमेवर दारू तस्करी रोखण्यात नवापूर पोलिसांना मोठं यश आलं आहे. भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली सुरू असलेली विदेशी दारूची तस्करी पोलिसांच्या कारवाईत उघड झाली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल पाच लाख रुपयांचा दारूचा साठा जप्त केला आहे. यामुळे दारू तस्करांचे धाबे दणाणले आहे. 

नवापूर शहरातून जाणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक ६ वरील पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की, भाजीपाला वाहतूक केल्या जात असलेल्या वाहनातून मोठी दारू तस्करी केली जात आहे. माहिती मिळताच नवापूर पोलिसांनी महाराष्ट्र- गुजरात सीमा असलेल्या महामार्गावर सापळा रचला. येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यास सुरवात केली होती. 

दारूच्या खोक्यांवर होता भाजीपाला 

दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पांढऱ्या रंगाची पिकअप पोलिसांनी थांबवण्याचा इशारा करताच चालकाने वाहन वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करत तत्काळ गाडीला रोखलं आणि तपासणी सुरू केली. वरवर पाहता गाडीत केवळ भाजीपाला दिसत होता. पण, पोलिसांनी बारकाईने तपासणी केली. तेव्हा भाजीपाल्याच्या खाली विदेशी दारूचे मोठ्या प्रमाणावर खोके लपवलेले आढळले. 

५ लाख रुपयांचा दारूसाठा जप्त 

गाडीत आढळून आलेला ५ लाख रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा पोलिसांनी जप्त केला असून, पिकअप वाहन देखील ताब्यात घेतले आहे. सध्या नवापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर पोलिसांनी केलेली ही धडक कारवाई दारू तस्करांचे धाबे दणाणून सोडणारी आहे. पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन आणि उपअधीक्षक आशित कबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT