Kanbai Utsav Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Kanbai Utsav: खानदेशाची कुलस्वामिनी कानबाई माता उत्सवाचा जल्लोष; मिरवणूक काढत विसर्जन

Nandurbar News खानदेशाची कुलस्वामिनी कानबाई माता उत्सवाचा जल्लोष; मिरवणूक काढत विसर्जन

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: सणांचा महिना श्रावण सुरु होताच खान्देशातील ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव मोठ्या हर्षोलासात धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात साजरा केला जात असतो. कोकणात सर्व चाकरमाने गणपती उत्सवाला आपल्या गावाकडे परततात. त्याचप्रमाणे खानदेशात कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी देश विदेशातील कुटुंबातील सदस्य घराकडे न चुकता येतात. अवघ्या दीड दिवसांचा हा सण  खानदेशातील प्रत्येक कुटुंबाला एकतेचा संदेश देत वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा देऊन जातो. एक दिवसाचे पाहुनी आलेल्या कानुबाई मातेला आज मोठ्या उत्साहात वाजत गाजत निरोप देण्यात आला. खानदेशातील कष्टकऱ्यांची कुलदैवत असलेल्या कानबाई मातेला शेतकऱ्यांनी पावसासाठी साकडे घातले आहे. (Latest Marathi News)

खानदेशातील सर्वात प्रसिद्ध असे ग्रामदैवत म्हणून कानबाई मातेचा लौकिक आहे. अत्यत लोभस आणि साधं असं हे दैवत आहे. या कानबाई मातेची फक्त तीनच मंदिर आहेत. निसर्गपूरक असा हा कानबाईचा सण खान्देशात श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. अत्यंत पवित्र आणि स्वच्छ वातावरणात सुहासिनी मातेची स्थापना करतात. कानबाई मातेची स्थापना ज्या ठिकाणी केली जाते; तिथे फुलमाळानी सजवून छोटासा गाभारा आणि मंडप तयार केला जातो. तांब्यावर नारळ ठेवलं जात त्या नारळाला नथ, डोळे लावून कानबाई मातेचे रूप दिले जाते. त्याला अलंकारांनी सजवले जाते. मातेचं हे रूप लोभस आणि देखणं राहत. आपलंस वाटणार कानबाई मातेचे हे रूप पाहण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्य आवर्जून उपस्थति राहतो. 

कानुबाईला निरोप 

१०७ प्रकारच्या वनस्पतीं आणि सात नद्यांचे पाणी आणून कानबाईचे पूजा सजवली जाते. रविवारी स्थापन केलेल्या कानबाई मातेला सोमवारी मोठ्या उत्साहात पारंपारिक खानदेशी नृत्य फुगडी खेळत निरोप देण्यात आला. श्रावण सरींच्या हजेरीने दरवर्षी कानबाई मातेला निरोप दिला जातो. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने सर्वांची नजर पावसाकडे लागू नये आणि खानदेशातील कष्टकरी शेतकऱ्याने आता कानबाई मातेला पावसासाठी साकडे घातले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचं कोरड्या विहिरीत उतरून आंदोलन

Ratnagiri Temple : ४०० वर्ष जुनं गणपती मंदिर अन् स्वच्छ समुद्रकिनारा, रत्नागिरीतील 'या' ठिकाणाची परदेशी पर्यटकांनाही भुरळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतात विलीन; राजकारणात शोककळा

BJP MLA : ४,००० कोटींची संपत्ती, पण भाजप आमदाराने मागितली भीक; मिळाले फक्त ८४ रुपये, राज्यात चर्चा

सहकारी साखर कारखान्यांसाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय; शासनाकडून मिळणार पाठबळ

SCROLL FOR NEXT