महाराष्ट्र

पावसाचे पाणी मोजणारे ‘जळखे’ गाव!

पावसाचे पाणी मोजणारे ‘जळखे’ गाव!

साम टिव्ही ब्युरो

शनिमांडळ (नंदुरबार) : हवामान बदलामुळे पावसात अनियमितता आली आहे. यामुळे अनेक गावे दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहेत. भारत देशासह संपूर्ण महाराष्ट्र पिण्यासाठी व शेतीसाठी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. यासाठी वर्षातून चार महिने पडणाऱ्या पावसाचे पाण्याचे मोजमाप करून योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. याची जाणीव पाणी फाऊंडेशन समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या दिनेश वसावे यांना झाली यातून ते गावात पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे मोजमाप करीत आहेत. (nandurbar-news-Jalkhe-village-which-measures-rain-water)

जळखे हे गाव नंदुरबारच्या पश्चिमेला आहे. या भागात पाऊस बऱ्यापैकी पडतो, मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. शेतीला मुबलक पाणी मिळावे यासाठी विहिरीला पाणी गरजेचे आहे. यातून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटू शकतो. शासकीय यंत्रणेद्वारे पावसाचे पडणारे पाणी मंडळनिहाय मोजणी केली जाते. मात्र ही माहीती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचत नाही. शिवाय हवामान बदलामुळे पावसात आलेली अनियमितता यामुळे अनेक वेळा एका गावात पाऊस पडतो; तर दुसऱ्या गावात पडत नाही. यामुळे मंडळनिहाय पावसाचे मोजमाप होत असले तरी त्यात त्रुटी असू शकतात. गावकऱ्यांनी पावसाचे पडणारे पाण्याचे मोजमाप गावातच केल्यास आपल्या गाव- परिसरात किती पाऊस पडला याची माहिती होऊन याचा फायदा पीक नियोजन करण्यासाठी होईल. यातून गावाला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त ठेवता येईल. यासाठी त्यांना वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे. ग्रामसेवक गिरीश घुगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गावाला पाण्याच्या दृष्टीने समृद्ध करण्याचे स्वप्न आहे; असे गिरीश घुगे ग्रामसेवक यांनी सांगितले.

"पावसाच्या पाण्याचे नियोजन करणारे गावच भविष्यात स्वयंपूर्ण होऊ शकणार आहेत,कायम शासनाच्या टँकर कडे डोळे लावून बसल्याने गावाला समृद्ध होता येणार नाही,यासाठी समृद्ध गाव स्पर्धेत पाणी व्यवस्थापन यावर भर दिला आहे"

- निलेश बढे,तालुका समनव्यक पाणी फाऊंडेशन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

SCROLL FOR NEXT