Nandurbar Congress Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Congress : राजेंद्र गावितांना उमेदवारीनंतर कॉग्रेसमध्ये अंतर्गत कलह; उमेदवारीसाठी ३ कोटी दिल्याचा उदेसिंग पाडवी यांचा आरोप

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मतदारसंघातून काँग्रेसने राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे काँग्रेसमध्ये असलेले पदाधिकारी नाराज झाले आहेत.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : भाजपचा राजीनामा दिलेल्या राजेंद्र गावित याना शहादा मतदरासंघातून काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली. यानंतर कॉग्रेसमधील अंतर्गत कलहाला सुरवात झाली आहे. राजेंद्र गावितांनी जाहीर झालेल्या या तिकीटामागे कोट्यावधीच्या उलाढालीचे राजकारण असल्याचा दावा माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केला आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा मतदारसंघातून काँग्रेसने राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे काँग्रेसमध्ये असलेले पदाधिकारी नाराज झाले आहेत. दरम्यान राजेंद्र गावित यांनी तिकाटीसाठी तीन कोटी दिले असून उर्वरीत दोन कोटी एबीफार्म मिळाल्यानंतर देणार असल्याचे राजेंद्र गावितांचेच कार्यकर्ते सांगत असल्याचा दावा उदेसिंग गावित यांनी केला आहे. आज राजेंद्र गावितांच्या उमेदवारी विरोधात (Congress) कॉग्रेसच्या पाच इच्छुकांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाचा पुर्नविचार न झाल्यास थेट सांगली पॅटर्नचा इशारा दिला आहे. 

कॉग्रेसचे सदस्यही नसलेल्या राजेंद्र गावितांना जाहीर झालेल्या उमेदवारीने कुछ तो दाल मे काला है. या पुरी दाल ही काली है.. असा आरोप देखील यावेळी उपस्थित इच्छुकांनी केला. या पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी नाईक, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, झेलसिंग पावरा असे पाच इच्छुकांनी खुलेआम राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. उर्वरीत दोन इच्छुक काही कारणास्तव बाहेर असून त्याचा देखील विरोध केला आहे. ज्या माणसाने कधी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला नाही; त्याला कशी उमेदवारी जाहीर झाली? असा प्रश्न जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ‘हि-मॅन’ची एक्झिट चटका लावणारी, धर्मेंद्र यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांची भावुक प्रतिक्रिया

Pension: ३० नोव्हेंबरआधी ही ३ कामे कराच, अन्यथा मिळणार नाही पेन्शन; थेट नोटीस येणार

Screen time impact: लहान वयात मुलांच्या हाती स्मार्टफोन देणं ठरतंय घातक; तरूणपणात करावा लागतोय मानसिक आरोग्याशी संघर्ष

Shocking : धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून बापाच्या डोक्यात हैवान घुसला, मुलीसमोरच आईची केली हत्या

Dharmendra Death: जय-विरूची जोडी तुटली; धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन भावुक

SCROLL FOR NEXT