Sarangkheda Festival Saam tv
महाराष्ट्र

Sarangkheda Festival : सारंगखेड्याचा घोडेबाजार तेजीत; उत्तर प्रदेशातून आलेली रुची ठरतेय लक्षवेधी, लाखो रुपये किमतीचे घोडे विक्रीसाठी दाखल

Nandurbar News : फेस्टिवलसाठी देशभरातील १४ राज्यातून अश्व मालक आपल्या घोड्यांसह दाखल होणार आहेत. त्यात अश्व नृत्य स्पर्धा, आश्व सौंदर्य स्पर्धा, घोड्यांच्या रेस तसेच अश्व क्रीडा स्पर्धांचा समावेश

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील घोडे बाजार देशभरात प्रसिद्ध आहे. सारंगखेडा येथील यात्रोत्सवाला सुरवात होत असून या यात्रोत्सवात होणाऱ्या घोडेबाजारात २४०० पेक्षा अधिक घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. एकापेक्षा एक रुबाबदार असे घोडे या ठिकाणी येणाऱ्या अश्वप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. यात उत्तर प्रदेशमधून आलेली रुची सध्या सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्यात उद्यापासून म्हणजे १८ डिसेम्बरपासून सुरू होणाऱ्या चेतक फेस्टिवलसाठी देशभरातील १४ राज्यातून अश्व मालक आपल्या घोड्यांसह दाखल होणार आहेत. त्यात अश्व नृत्य स्पर्धा, आश्व सौंदर्य स्पर्धा, घोड्यांच्या रेस तसेच अश्व क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. अशी माहिती चेतक फेस्टिवलचे आयोजक जयपालसिंह रावल यांनी दिली आहे. या ठिकाणी आतापासून घोडे दाखल झाले आहेत. 

रुचीला तीन लिटर दूध, अंड्यांचा खुराक 

तापी नदीच्या काठावर भरलेल्या अश्वमेळाव्यात उत्तर प्रदेशातील बरेली येथून आलेली रुची आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे. साडेचार वर्षीय रुचीचा रुबाब एखाद्या पैलवानासारखा आहे. सातपुड्यात थंडीचे प्रमाण अधिक असल्याने तिच्या खुराकाची विशेष काळजी घेतली जात आहे. तीन लिटर दूध, अंडी, गहू, बाजरी तसेच सरसोचे तेल ह्या त्याच्या खुराकात दिल्या जातात. विशेष म्हणजे चार व्यक्ती तिच्या मालिशसाठी दिवसभर तैनात असतात. 

यानंतर सारंगखेड्याच्या घोडेबाजारात चर्चा आहे; ती धुळे जिल्ह्यातील दुसाने येथील रोहित पाटील यांच्या बाहुबलीची ब्लड लाईनचा. बाहुबली आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. बाहुबली अनमोल असल्याने त्याची किंमत फक्त असो जानकारच करू शकतील हे निश्चित. याठिकाणी देशभरातून अश्वप्रेमी दाखल होत असतात. इतकेच नाही तर सिनेकलावंतांची देखील चेतक फेस्टिव्हल निमित्ताने हजेरी लागत असते. आपल्यालाही घोड्याच्या वेगाचा थरार अनुभवाचा असेल तर आपणही सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवल भेट देणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आमदार चिखलीकर यांना भविष्यात मोठी जवाबदारी मिळणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले संकेत

भाजप प्रणित NDAला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची कारला धडक, २ जवानांसह ५ जणांचा मृत्यू

Dudhi Bhopla Sweet Dish : दुधी भोपळ्याचा हलवा तर खाल्ला असाल, मग एकदा ट्राय करा 'ही' स्वीट डिश

WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाचा भारताला जबरदस्त धक्का, WTC शर्यतीत पाकिस्ताननंही टाकलं मागे

SCROLL FOR NEXT