Bijasan Mata Mandir : बिजासन मंदिरातून ३ चांदीचे मुकुट चोरी; चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Dhule News : मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सीमेवरील असलेल्या प्रसिद्ध माता बिजासन मंदिर आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिर परिसरात अनेक लहान- मोठे मंदिरे उभारण्यात आले आहेत.
Bijasan Mata Mandir
Bijasan Mata MandirSaam tv
Published On

धुळे : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राज्य सीमेवर असलेल्या प्रसिद्ध बिजासन मंदिरात रात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली आहे. यात चार चोरट्यांनी तीन चांदीचे मुकुट व दानपेटी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली असून हा प्रकार आज सकाळी सहाला पुजारी मंदिरात आल्यानंतर उघड झाला. 

मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सीमेवरील असलेल्या प्रसिद्ध माता बिजासन मंदिर आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिर परिसरात अनेक लहान- मोठे मंदिरे उभारण्यात आले आहेत. दरम्यान रात्रीच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी मंदिर परिसरात प्रवेश केला. यानंतर त्यांनी मुख्य मंदिरामागे असलेल्या राम दरबार मधील मंदिराचे बंद दरवाजा लोखंडी टॉमीच्या सहाय्याने तोडून मंदिरामध्ये प्रवेश केला. 

Bijasan Mata Mandir
Akola News : मुख्याध्यापकाचा त्रास; कंटाळून भाजप नेत्याच्या मुलीने उचलले उपोषणाचे हत्यार

दानपेटी सुरक्षित 

यानंतर राम दरबार मंदिरामधील ८० ते ९० हजार रुपये किमतीचे मूर्त्यांचे तीन चांदीच्या मुकुटांची चोरी केली. तर सातमाता मंदिराबाहेर ठेवलेल्या दानपेटी चोरी करून तोडण्याचा प्रयत्नही केला. मात्र दानपेटी तुटली नसल्याने दान पेटी सुरक्षित राहिली आहे. मात्र तीन चांदीचे मुकुट चोरून चोरटे पसार झाले आहेत. दरम्यान सकाळी पुजारी मंदिरात आल्यानंतर मंदिरात मुर्त्यांची डोक्यावरील चांदीचे मुकुट गायब झाल्याचे दिसून आल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले.  

Bijasan Mata Mandir
KDMC Abhay Yojana : थकबाकी भरणाऱ्यांना शंभर टक्के व्याजमाफी; मालमत्ता कर वसुलीसाठी केडीएमसीची अभय योजना

चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

सकाळी सहा वाजेच्या सुमारास चोरी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे मंदिर परिसरात चार सुरक्षारक्षक तैनात असून जवळपास दीड ते दोन तास चोरट्यांनी धुमाकूळ घातला असल्याचे समोर आले आहे. मंदिरात झालेल्या चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली. त्या अनुषंगाने पोलिस आता पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com